महासंस्कृती महोत्सवात महाराष्ट्राच्या लोकगाण्यांनी जालनेकर मंत्रमुग्ध

जालना, १६ फेब्रुवारी २०२४ : महासंस्कृती महोत्सवात जालन्याचे भूमिपुत्र प्रसिद्ध कलावंत शाहीर रामानंद उगले आणि शाहीर कल्याण उगले यांनी ‘महाराष्ट्राची लोकगाणी’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून सादर केलेला गोंधळ, पोवाडा, भारुड, बतावणी, स्फूर्तीगीते, पारंपारिक गाणी, महाराष्ट्राची महती सांगणारी गाणी, गण आणि लोकगीतांचा जालनेकरांनी मनमुराद आस्वाद घेतला.

महाराष्ट्रातील विविध कलाप्रकार सादर करुन शाहिरांनी जालनेकरांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. पारंपारिक वाद्य, वेशभूषा यामुळे हा कार्यक्रम अतिशय सुंदर झाला. वासुदेवाच्या माध्यमातून यावेळी प्रबोधनही करण्यात आले. तसेच बाजीप्रभूच्या पोवाडयाने प्रेक्षकांच्या अंगावर अक्षरशः काटा आला.

न्यूज अनकट प्रतिनिधी : विजय साळी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा