पुरंदर, दि.१९ ऑगस्ट २०२०: गेली दोन महीने थंडी मारलेल्या पावसाने मागील आठवड्यात जोरदार हजेरी लावली आणि वाल्हा परीसरातील ओढे नाले भरून वाहू लागले आहेत. त्यामुळे वाल्हे ग्रामस्थांनी आज बापसाई वस्ती येथे जल पुजन केले. जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष डॉ.दिगंबर दुर्गाडे यांच्या हस्ते हे जलपुजन करण्यात आले. गेल्या आठवडाभरात संततधार पर्जन्यवृष्टी सुरू राहिल्याने पिंगोरी-कवडेवाडीसह दौंडज परिसरामधील ओढे-नाले भरुन वाहू लागले आहेत.
वाल्हे परिसरात जोरदार पाऊस नसला तरी पिंगोरी व दौंडज येथील पावसाने का होईना वाल्हे परिसरातील ओढे-बंधारे व नाले भरण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे या ओढ्यावरील पाण्यावर अवलंबुन असलेल्या वाल्हे परिसरातील शेतकऱ्यांच्या शेती सिंचनाचा तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. भुगर्भाची पाणी पातळी उंचावल्यामुळे परिसरातील विहिरी, बोअरवेल यांची पाणी पातळी दिवसेंदिवस वाढू लागली आगल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. दरम्यान आज बापसाईवस्ती येथील बंधारा ओसंडुन वाहू लागल्याने पुणे जिल्हा बॅकेचे माजी अध्यक्ष प्रा.दिगंबर दुर्गाडे यांच्यासह ग्रामस्थांनी गुलाल उधळुन ग्रामदैवताचा जयघोष करत जलपुजन केले.
याप्रसंगी सरपंच अमोल खवले, दत्तात्रय पवार, महादेव चव्हाण, सुनिल पवार, सुर्यकांत पवार, समदास भुजबळ, संभाजी पवार, सुर्यकांत भुजबळ, संदेश पवार आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
न्युज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे.