गोल पोस्ट महाराष्ट्र जलसंपदा विभागाची परीक्षा पुढे ढकलली

जलसंपदा विभागाची परीक्षा पुढे ढकलली

मुंबई: राज्याच्या जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता पदांची २५व २६ नोव्हेंबर २०१९ रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
राज्याच्या जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता पदांची व बृहन्मुंबई महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता पदांच्या भरतीकरिता एकाच दिवशी परीक्षा होणार होती.
अनेक उमेदवारांनी दोन्हीही परीक्षांसाठी अर्ज केले होते. यामुळे निर्माण झालेल्या पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करावा, अशी मागणी आमदार सतीश चव्हाण यांनी केली होती. अखेर जलसंपदा विभागाची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचे म्हटले आहे

error: Content is protected !!
Exit mobile version