इंडोनेशियात जकार्तामध्ये जामा मशीद जमीनदोस्त

इंडोनेशिया, २० ऑक्टोंबर २०२२: इंडोनेशियाची राजधानी जकार्तामध्ये एका मोठ्या मशिदीला भीषण आग लागली. या आगीच्या दुर्घटनेनंतर मशिदीची इमारत जमीनदोस्त झाली. इंडोनेशियाची राजधानी जकार्तामध्ये जकार्ता इस्लामिक सेंटरच्या परिसरातील ही मशीद आहे.

मिळालेल्या माहितीनुसार इंडोनेशियाची राजधानी जकार्तामध्ये मोठ्या जामा मशिदीला भीषण आग लागली. आग लागल्यानंतर मशिदीची इमारत पूर्णपणे जमीनदोस्त झाली. पण या दुर्घटनेत कोणीही जखमी झाली नसल्याची माहिती समोर आलीय. तसेच मशिदीच्या घुमटाच्या नूतनीकरणाचं काम सुरू असताना ही आग लागल्याची माहिती समोर येत आहे. ही आग इतकी वेगाने पसरली की काही वेळात ही आग मशिदीच्या घुमटात वेगानं पसरली आणि मशिदीचा घुमट जमीनदोस्त झाला.

बुधवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली तर बुधवारी या मशिदीच्या नूतनीकरणाची काम चालू होते, त्यावेळी अचानक दाट काळा धूर हवेत पसरताना दिसला. त्यावेळी आग लागल्याची माहिती सर्वदूर झाली.

यानंतर अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. पण, आग इतकी भीषण होती की संपूर्ण घुमटात पसरली आणि मशीद कोसळली. घुमटाला आग कशी लागली याबाबत कोणतीही अधिकृत माहिती जारी करण्यात आलेली नाही. मात्र, माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, मशिदीमध्ये नूतनीकरणाचे काम सुरू होते. यादरम्यान आग लागली असावी अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

जामा मशिदिला आग लागली तेव्हा सुरुवातीला परिसरातील लोकांना बाहेर काढण्यात आले. त्यामुळे घुमट पडल्यावर कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. या अपघातात कोणीही जखमी झाले नसल्याचे स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा