गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा जांब गावकऱ्यांची सकाळ आरतीविना; मुर्ती चोरीमुळे गावकरी निराश

जांब गावकऱ्यांची सकाळ आरतीविना; मुर्ती चोरीमुळे गावकरी निराश

जालना, २३ ऑगस्ट २०२२: जालना इथे स्वामी समर्थाचं जन्मस्थान असलेल्या जांब समर्थ गावात श्रीराम मंदिरातील काल झालेल्या मुर्ती चोरीच्या घटनेनंतर गावावर अक्षरश: शोककळा पसरली आहे. रोज सकाळी सात वाजता व संद्याकाळी सात वाजता मंदिरात आरती होत असते.

पण देवच चोरीला गेल्यानंतर ज्या गावकऱ्यांची सुरुवात श्रीरामाच्या दर्शनाने होते त्यासाठी आज गावकरी मुकंले आहे. मुर्ती चोरीचा निषेध म्हणून गावकरी उद्या एक दिवस अन्नत्याग करण्याच्या तयारीत आहेत. घनसावंगी तालुक्यातील जांब समर्थ गावात ४५० वर्षां पूर्वीच्या दुर्मिळ आणि ऐतिहासिक मुर्तीची चोरी झाली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार चोरांनी अंदाजे पहाटे दोन ते तीनच्या सुमारास ही चोरी केली असावी. आणि विषेश म्हणजे चोरीचा प्रकार देखील चक्रावून सोडणारा आहे. चोरांनी चोरी करताना जवळच एका खांबावर अडकवलेली चावी घेतली. त्या चावीने कुलूप उघडून गाभाऱ्यात प्रवेश केला, त्यात मौल्यवान अशा पंचधातूंच्या मुर्ती घेऊन पोबारा केला आहे.

जाताना विषेश म्हणजे चावी पुन्हा त्याच जागेवर नेऊन ठेवली होती. गृहमंत्र्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. पोलीस देवांची चोरी करणाऱ्या चोरांचा शोध घेत आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version