जमिनीतील वादावरून कुटुंबास जीवे मारण्याची धमकी

श्रीगोंदा, दि. ४ जून २०२०: तालुक्यातील अजनुज येथे राहत असलेल्या मीरा गिरकर यांनी पवारवाडी येथे गट नंबर २४५ मधील खरेदी केलेल्या स्वतःच्या मालकीच्या जमिनीत पतीसह मशागत करत असताना. गावातील आठ जणांनी त्यांना शेती मशागत करण्यास विरोध करत जीवे मारण्याची धमकी देत शिवीगाळ केली.

आठ जणांनी याच गटातील दत्तात्रय अर्जुन सुर्यवंशी याचे छप्पर पेटवल्याने या आठ जणांच्या विरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दि. १ जून रोजी वेगवेगळे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये मीरा रावसाहेब गिरकर यांनी फिर्याद दिली असून त्यांनी फेब्रुवारी महिन्यामध्ये पवारवाडी येथे गट नंबर २४५ मध्ये एक हेक्टर २३ आर जमीन खरेदी केली असून त्यांची ते मशागत करत असताना तिथे अंबादास दशरथ मालुसरे, संभाजी अंबादास मालुसरे, पांडुरंग अंबादास मालुसरे, प्रशांत संभाजी मालुसरे, प्रमोद मालुसरे, उषा मालुसरे, मंगल मालुसरे, सोनू गायकवाड यांनी शेतात येऊन चालू असलेला ट्रॅक्टर अडवला.

ही आमची शेती आहे. असे म्हणून या आठ जणांनी तुम्ही इथे यायचे नाही. म्हणून रावसाहेब गिरकर याची हातात दांडा घेऊन फिर्यादीच्या पतीची गचंडी धरून तुम्हाला जीव मारतो असे म्हणत धमकी, शिवीगाळ केली असल्याने या आठ जणांच्या विरोधात मीरा गिरकर यांनी फिर्याद दिली आहे. याच गटात शेती असलेले दत्तात्रय अर्जुन सुर्यवंशी रा.जैनकवाडी, बारामती यांनी अजनुजमध्ये गट नंबर २४५ मध्येच ६० आर येवढी जमीन फेब्रुवारी २०२० मध्येच खरेदी केली आहे. या शेतात निवार्‍या करता छप्पर बांधले आहे. याच शेतात रावसाहेब गिरकर आणि सुर्यवंशी हे मशागत करत शेती पुढील पिकासाठी व्यवस्थित करत होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा