जामखेड शहरातून रोहित पवार यांची भव्यरॅली.

अहमदनगर: राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित आमदार रोहित पवार यांनी आज जामखेड-कर्जत मतदार संघातील जामखेड शहरातून भव्य मिरवणूक काढली. यावेळी ३०जेसीबीमधून गुलाल उधळण्यात आला.

निवडणूक झाल्यानंतर रोहित पवार यांनी पहिल्यांदाच नागरिकांचे आभार मानण्यासाठी भव्य रॅली काढली होती. यावेळी त्यांचे प्रत्येक चौकाचौकात स्वागत आणि सत्कार करण्यात आला.
यावेळी त्यांनी मतदार संघातील मुख्य समस्यांवर लक्ष देऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी सर्वसामान्यांसाठी प्रत्येक वेळी उपलब्ध होणार असल्याचेही सांगितले.
या मतदार संघातून भाजपचे राम शिंदे यांचा रोहित पवार यांनी मोठ्या मताधिक्याने पराभव केला होता. आता आम्हाला हक्काचा आमदार मिळाल्याची भावना स्थानिकांनी व्यक्त केली.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा