जम्मू काश्मीर, १४ सप्टेंबर २०२०: जम्मू-काश्मीर बोर्डानं काश्मीर विभागासाठी दहावी व बारावीच्या द्वितीय-वार्षिक बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर केलाय. जम्मू-काश्मीर बोर्डानं जेकेबीएस १० वी, १२ वी निकाल २०२० आज, १४ सप्टेंबर २०२० रोजी जाहीर केले आहे. काश्मीर विभागातील सर्व विद्यार्थी जे माध्यमिक शाळा परीक्षा (इयत्ता १० वी) एसएसई द्वि-वार्षिक २०१९-२०२० किंवा उच्च माध्यमिक भाग दोन (वर्ग १२ वी) वार्षिक / द्वि-वार्षिक २०१९-२० (खाजगी) परीक्षेत हजर होते, ते विद्यार्थी खाली दिलेल्या jkbose.ac.in च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपला निकाल आणि गुणपत्रक तपासू शकता.
या प्रमाणे निकाल तपासा
जेकेबीओएसई १० वी व १२ वी निकाल २०२० तपासण्यासाठी काश्मीर विभागातील विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत वेबसाइट, jkbose.ac.in वर भेट दिल्यानंतर संबंधित पृष्ठावरील होम पेजवर क्लिक करावं लागल. यानंतर एक नवीन पृष्ठ उघडल जिथं विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर भरायचा आहे. यानंतर, ‘व्यू रिजल्ट’ या लिंकवर क्लिक करा. यानंतर, विद्यार्थी त्यांचे निकाल पाहण्यास सक्षम असतील आणि त्यांचे स्कोअर कार्ड प्रिंट करण्यास देखील सक्षम असतील.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे