काश्मीर-लडाख:सरकारने ५ ऑगस्टला घेतलेला ऐतिहासिक निर्णयाची आज अंमलबजावणी पूर्ण होणार आहे. पाच ऑगस्ट रोजी कलम ३७० हा जम्मू-काश्मीर आणि लाडाख या राज्यातून रद्द करण्यात आला होता. जम्मू काश्मीर आणि लडाख यांना आज केंद्रशासित प्रदेश म्हणून ओळख मिळणार आहे. विशेष म्हणजे लडाख या दिवसासाठी खूप वर्षापासून वाट बघत होता आजचा दिवस लडाखसाठी ऐतिहासिक दिवस मानला जात आहे. लडाखमधील नागरिकांची ही खूप दिवसापासून ची मागणी होती की लडाखला विशेष राज्याचा दर्जा देण्यात यावा.
आज सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आहे. सरदार वल्लभाई पटेल यांनी देशाच्या एकतेसाठी विशेष कार्य केले आहे. देशातील अनेक राज्य भारतामध्ये विलीन करण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी केली. यांच्या जयंतीच्या दिवशी या दोन्ही राज्यांना केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला आहे.