जम्मू-काश्मीर:जम्मू-काश्मीरमधील सफरचंद व्यापाऱ्यांवर हल्ला करण्याचा आणखी एक प्रयत्न केला गेला, गुरुवारी रात्री उशिरा
भरधाव ट्रकला अज्ञात इसमांनी पेटवून दिले.
चालक आणि त्याच्या सहायकाने तातडीने या आगीवर नियंत्रण मिळवले आणि त्यामुळे होणाऱ्या जीवितहानी व
होणारे फळांचे नुकसान वाचवले.सोमवारपासून तीन वेगवेगळ्या हल्ल्यात राजस्थानमधील ट्रक चालक, छत्तीसगडमधील प्रवासी कामगार आणि
पंजाबमधील एक सफरचंद व्यापारी ठार तर एक व्यापारी गंभीर जखमी झाला आहे
तेथील प्रशासनाने व्यापाऱ्यांना आणि प्रवाश्यांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे, सफरचंद व्यापार्यांच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीर प्रशासनाने हा निर्णय घेतला.