माता-बाल आरोग्यासाठी ‘जननी सुरक्षा योजना’ मदतीला

माता आणि बालकांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी केंद्रसरकारने सुरू केलेली ‘जननी सुरक्षा योजना’ गरीब महिलांसाठी वरदान ठरली आहे. या योजनेमुळे शहरी आणि ग्रामीण भागातील महिलांना सुरक्षित प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल होण्यास प्रोत्साहन मिळत आहे. या योजनेअंतर्गत, प्रसूतीनंतर शहरी भागातील महिलेला ६०० रुपये आणि ग्रामीण भागातील महिलेला ७०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. जर प्रसूती सिझेरियन झाली, तर दोन्ही भागांतील महिलांना १५०० रुपयांचा लाभ मिळतो.

बीपीएल कार्डधारक किंवा ओळखपत्र असलेल्या गर्भवती महिला आणि त्यांची पहिली किंवा दुसरी प्रसूती शासकीय किंवा मान्यताप्राप्त रुग्णालयात झाली असल्यास त्या या योजनेसाठी पात्र आहेत. यामुळे, पुणे जिल्ह्यासह राज्यभरात रुग्णालयांत प्रसूती होण्याचे प्रमाण वाढले आहे, ज्यामुळे माता-बालकांचे आरोग्य सुरक्षित राखण्यास मदत होत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी चैतन्य पगारे