जाणून घ्या ढोबळी मिरची लागवड पद्धत

  • महाराष्ट्रात पुणे, अहमदनगर, नाशिक, सातारा या जिल्हांमध्ये ढोबळी मिरचीची लागवड केली जाते.   
  • *हवामान* : ढोबळी मिरचीला दिवसाचे सरासरी तापमान 25 अंश से. व राञीचे 14 अंश से. पेक्षा कमी झाल्यास वाढीवर अनिष्ट परिणाम होतो.
  • *जमीन व हंगाम* – ढोबळी मिरचीची लागवड – जुन-जुलै, ऑगस्ट – सष्टेंबर
    जानेवारी- फेब्रुवारी महिन्यात करतात. संपूर्ण वर्षभर सुद्धा शेडनेट किंवा ग्रीन हाऊसमधे आपण ढोबळी मिरचीचे           उत्पादन घेऊ शकतो. ढोबळी मिरचीला जमीन चांगली कसदास व सुपीक लागते. मध्यम ते भारी, काळी पाण्याचाउत्तम     निचरा होणारी जमीन या पीकास योग्य आहे.
  • *बियाण्याचे प्रमाण* : दर हेक्टरी 03 किलो बियाणे लागते. एक किलो बियाण्यास पेरणीपूर्वी 02 ग्रॅम शायरम चोळावे.  
  •  पूर्वमशागत* : ढोबळी मिरचीची लागवड रोपे लावून करतात. यासाठी एक किंवा दोन आर क्षेञावर रोपवाटीका करावी. जमीन चांगली उभी आडवी नांगरून हेक्टरी 15 ते 20 टन शेणखत घालावे. पूर्वीच्या पीकांचे धसकटे गोळा करून दोन कुळवाच्या पाळया घ्याव्यात.
  •   *लागवड* : रोपे तयार करताना 1 मीटर चे गादी वाफे तयार करून त्यात बी पेरावे. वाफ्यातील रोपांना झारीने पाणी दयावे. रोपे 45 दिवसात (06 ते 08 आठवडयानंतर ) पुर्नलागवडीसाठी तयार होतात.पुर्नलागवड करताना 60 सेंमी अंतराने स-या काढाव्यात. रोपी सरीच्या दोन्ही बाजून 30 सें.मी.अंतरावर लावावे व पुर्नलागवड झाल्यावर लगेच पाणी दयावे. 
  •  *खते व पाणी व्यवस्थापन* : हेक्टरी 15 ते 20 टन शेणखत व्यतीरिक्त 150 किलो नञ , 150किलो स्फुरद व 200किलो पालाश व स्फुरद चा पूर्ण व नञाचा अर्धा हफ्ता लागवडीच्यावेळी दयावा. नञाचा उरलेला हफ्ता लागवडीनंतर एक महिन्याने दयावा. ढोबळी मिरचीला लागवडीपासुन नियमित भरपूर पाणी दयावे. ठिबक सिंचनअसल्यास 55-60 पाण्याची बचत होते.
  •   *आंतरमशागत* : ढोबळी मिरची चुरडा-मुरडा या रोगास बळी पडत असते. त्यासाठी शेतात नेहमी स्वच्छता ठेवावी. सुरूवातीला गरजेप्रमाणे 2-3 खुरपणी करून घ्याव्यात.झाडांच्या मुळांशी हवा खेळती राहिली पाहिजे.                    *काढणी व उत्पादन* : फळे हिरवीगार व संपूर्ण वाढलेली असल्यास फळांची काढणी करावी. साधारणत: दर आठ दिवसांनी फळांची काढणी करावी. प्रति हेक्टरी 17 ते 20 टन सरासरी उत्पन्न मिळते.
 

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा