जपानकडून चीनला धक्का, भारतात येणाऱ्या या दोन कंपन्यांना जपान देणार सबसिडी

नवी दिल्ली, ६ नोव्हेंबर २०२०: जपान पुन्हा व्यवसायात चीनला असा धक्का देण्याची तयारी करीत आहे, ज्यामुळं भारताला फायदा होणार आहे. वस्तुतः दोन कंपन्यांचा मॅन्युफॅक्चरिंग बेस चीनकडून भारतात हलविण्यासाठी जपान या कंपन्यांना सबसिडी देण्याची तयारी करत आहे. टोयोटा-सुशो आणि सुमिदा या दोन कंपन्या आहेत. टोयोटा-सुशो भारतात रेअर अर्थ मेटल यूनिट उभारण्याच्या प्रक्रियेत आहेत, तर सुमिदा कंपनी ऑटोमोबाईलसाठी स्पेयर पार्ट्सचा व्यवसाय करेल.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, सरकारी सूत्रांनी म्हटलं आहे की, भारताकडून केवळ हा प्रयत्न केला गेला होता की या कंपन्या भारतात याव्या, परंतु हा सौदा अधिक आकर्षक करण्यासाठी जपाननं या कंपन्यांना अनुदान देखील देण्याचा निर्णय घेतला आहे.

वाणिज्यमंत्री पीयूष गोयल काय म्हणाले

ही बातमी सांगत वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी ट्वीट केलं की, “चीन मधून आपला मॅन्युफॅक्चरिंग बेस भारतामध्ये हलवण्यासाठी जपान या दोन कंपन्यांना आर्थिक सहाय्य देणार आहे. पुरवठा साखळी उपक्रमांतर्गत पारदर्शक व्यापार आणि गुंतवणूकीचं वातावरण सुनिश्चित करण्यासाठी आम्ही जपान आणि ऑस्ट्रेलियाबरोबर मिळून काम करत राहू.

जपानचा पुढाकार काय आहे

यावर्षी सप्टेंबरमध्ये जपाननं आपले कारखाने चीनपासून आसियान देशांमध्ये हलविणार्‍या कंपन्यांना अनुदानाच्या रूपात प्रोत्साहन देण्याची घोषणा केली होती. जपाननं असं म्हटलं आहे की, ज्या कंपन्या चीनमधून आपला व्यवसाय इतर आसियान देशांमध्ये उत्पादन निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू करंल त्या कंपन्यांना आर्थिक सहाय्य दिलं जाईल. जपाननं या यादीमध्ये भारत आणि बांगलादेशचा समावेश केला आहे, यानुसार आता जपानी कंपन्या भारत आणि बांगलादेश मध्ये ही आपलं उत्पादन सुरू करू शकतील.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा