जरांगे पाटील पुन्हा मैदानात, सोलापूर जिल्ह्यातील सभेने आजपासून महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात

मंगळवेढा, सोलापूर १५ नोव्हेंबर २०२३ : हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर आता जरांगे पाटील पुन्हा एकदा महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. सोलापूर जिल्ह्यातील सभेने आजपासून त्यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात होत आहे. आज सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील वांगी-१ या ठिकाणी जरांगेंची भव्य सभा होत आहे. तब्बल १२५ एकर शेतात या सभेचं नियोजन करण्यात येत आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने या सभेची तयारी करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने काल सभास्थळाची पाहणी देखील करण्यात आली.

सोलापूर जिल्ह्यातील एक लाख मराठा बांधव या सभेला उपस्थित राहणार असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे. या सभेच्या ठिकाणी मराठा बांधवांसाठी पिण्याच्या पाण्याची, रुग्णवाहिका आणि डॉक्टर यांची व्यवस्था करण्यात आली आहे. तर उजनी जलाशयाच्या नैसर्गिक सानिध्यात आयोजित करण्यात आलेली ही सभा संध्याकाळी ६ वाजता होणार आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मागील काही दिवसात ओबीसी नेत्यांवर देखील टीका केली होती. मंत्री छगन भुजबळ आणि विरोधी पक्षनेते विजयी वेडट्टीवार जरांगेंच्या निशाण्यावर आहे. तसेच भोकरदनमध्ये गाव बंदीचे बॅनर फाडल्यानंतर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर देखील जरांगे यांनी नाव न घेता टीका केली. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील या सभेतून जरांगे पाटील काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

न्यूज अनकट प्रतिनीधी : दगडू कांबळे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा