जसप्रीत बूमराहच्या पुनरागमनाने बळ; घरच्या मैदावर दुसऱ्या विजयाची आशा..

11
Jasprit Bumrah comeback MI vs RCB match
जसप्रीत बूमराहच्या पुनरागमनाने बळ घरच्या मैदावर विजयाची आशा..

Jasprit Bumrah comeback MI vs RCB match: यंदाच्या आयपीएल हंगामात पाचवेळा विजेत्या मुंबईला अद्याप सुर गवसता आलेला नाही. त्यांना पहिल्या चार सामन्यात आतापर्यंत एकच विजय मिळवता आला आहे. आज घरच्या मैदानावर मुंबईचा संघ बंगलोरशी भिडणार याशिवाय मुंबईच्या संघात त्यांचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बूमराहचे आगमन होणार आहे. यामुळे यंदाच्या हंगामात सुर गवसता न आलेल्या मुंबई इंडियन्सला बळ मिळणार आहे.

मुंबईने २०२० साली आयपीएलच्या विजेतेपदाचा मान पटकावला होता. मात्र,मागील ४ हंगामात त्यांना चांगली चमक दाखवता आलेली नाही. मागच्या हंगामात रोहित शर्माकडून मुंबई संघाचे कर्णधारपद काढून घेऊन हार्दिक पंड्याकडे सोपवण्यात आले. त्यामुळे मागील हंगामात कर्णधार हार्दिक पंड्यावर टीकांचा पाऊस पडला होता. मुंबईच्या संघाची परिस्थिति यंदाही मागील मोसमा सारखीच पहायला मिळाली. यंदाही त्यांना चार सामन्यांत केवळ एकच विजय मिळवता आला आहे. आता उर्वरित सर्व सामन्यांत मुंबई संघाला शानदार कामगरी साकारावी लागणार आहे.अन्यता यंदाही प्ले ऑफपासून त्यांना दूर रहावे लागेल.

वानखेडे स्टेडीयमवर खेकळवण्यात येणाऱ्या सामन्यात जसप्रीत बूमराह पुनरागमन करत असल्याची माहिती संघाचे प्रशिक्षक महेला जयवर्धन यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे आज मुंबईची बॉलिंग वानखेडेवर चालू शकते. दुसरीकडे लखनऊ विरुद्धच्या सामन्यात कर्णधार हार्दिक पंड्याने तिलक वर्माला मोठे षटके खेळनेअभावी रिटायर्ड म्हणून घोषित केले होते. त्याने घेतलेला हा निर्णय अनेक चाहत्याना आवडलेला नसून त्याचे पडसाद घरच्या मैदावर चाहत्याकडून उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी,प्रथमेश पाटणकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा