आंबेजोगाईत जातीअंत संघर्ष समितीचा उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

अंबाजोगाई, २४ फेब्रुवारी २०२४ : अंबाजोगाई शहर व परिसरात जिथे झोपडपट्टी आहे. त्या विभागात सरसकट आवास योजना सुरू करा. या व इतर मागण्यांसाठी शुक्रवारी जातीअंत संघर्ष समिती व निवारा हक्क समिती यांच्या वतीने उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. कॉ. बब्रुवाहन पोटभरे यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले.

अंबाजोगाई शहरातील नगरपरिषद अंबाजोगाईच्या मार्फत झोपडपट्टी विभागात सरसगट आवास योजनेची अंमलबजावणी करण्यात यावी, नगरपरिषद अंबाजोगाईने चालू केलेली अघोरी वसुली मोहीम बंद करावी, अंबाजोगाई शहरातील सर्व बेघर लोकांचा सर्वे करावा, पारधी वस्तीतील पिडीतांचे पुर्नवसन करावे, सर्व झोपडपट्टी भागात आवास योजना राबवावी, सनातनी कॉर्पोरेट केंद्रीय सत्तेने मतदान प्रक्रियेतून ईव्हीएम कायमचे हटवावे, आधी घरकूल योजना राबवावी व नंतर सर्व कर वसूल करावा, क्रांती नगर भागात स्वतंत्र रेशन दुकान द्यावे, किसान आंदोलनावर होत असलेली दडपशाही बंद करावी, मुस्लिम आरक्षणाची अंतपण करावे या मागण्यांसाठी शुक्रवारी सकाळी अंबाजोगाई शहरातून मोर्चा काढण्यात आला.

यावेळी मोर्चेकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी यांना दिले. या मोर्चाचे नेतृत्व कॉ.बब्रुवाहन पोटभरे यांनी केले. यावेळी विनोद शिंदे, भागवत जाधव, बाबा शेख, गुलनास पठाण, अशोक सोनवणे, राजाराम कुसळे, शेख इकबाल यांच्यासह महिला व नागरिक मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अरुन गित्ते

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा