पुण्यातील गणेशोत्सवाचा ऐतिहासिक क्षण जवळ आला आहे! 🌸
महाराष्ट्रातील सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या “श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट”च्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना उद्या, २७ ऑगस्ट रोजी भव्य सोहळ्यात पार पडणार आहे.
✨ जया किशोरींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा
प्रेरणादायी आध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते दुपारी १२:१५ वाजता हा पवित्र सोहळा पार पडणार आहे. गेल्या वर्षी त्यांनी बाप्पाच्या दर्शनावेळीच प्राणप्रतिष्ठा करण्याची इच्छा व्यक्त केली होती, त्यामुळे यंदा मंडळाने त्यांना हा सन्मान दिला आहे.
🥁 भव्य मिरवणुकीची सुरुवात
सोहळ्याची सुरुवात उद्या सकाळी ८:३० वाजता भव्य मिरवणुकीने होणार आहे. या मिरवणुकीत:
- लाठीकाठी आणि मर्दानी खेळांचे थरारक प्रात्यक्षिके 🎭
- सात प्रसिद्ध ढोल-ताशा पथके – श्रीराम, कलावंत, विश्वगर्जना, स्वयंभूगर्जना, गजर, नूमवि यांचे दमदार वादन 🔥
🚩 बाप्पाचा रथ ओढणार मंडळाचे कार्यकर्ते
गतवर्षीप्रमाणेच यंदाही मंडळाचे कार्यकर्तेच बाप्पाचा रथ ओढणार, ही सोहळ्याची खासियत.
💫 सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम
ट्रस्टचे उत्सव प्रमुख आणि विश्वस्त पुनीत बालन यांनी सांगितले की, गणेशोत्सवाच्या १० दिवसांमध्ये विविध सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
मंडळाने पुणेकरांना आवाहन केलं आहे की, या ऐतिहासिक प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहा आणि बाप्पाच्या दर्शनाचा लाभ घ्या. 🙏
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे











































