फलटण ४ मे २०२३ : भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी काल प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी जाहीर केली. कोळकी गावचे सुपुत्र व खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांच्या अत्यंत विश्वासू असणारे सहकारी जयकुमार शिंदे यांची प्रदेश कार्यकारणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली. जयकुमार शिंदे हे कुशल संघटक असून त्यांना पक्षीय कार्याचा दीर्घकालीन अनुभव आहे सध्या ते जिल्हा अध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हा भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस म्हणून व माढा लोकसभा मतदारसंघाचे लोकसभा संयोजक म्हणून ते उत्तम रीतीने काम पार पाडत आहेत.
यापूर्वी पक्षाने त्यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या दिल्या त्यामध्ये आत्मनिर्भर भारत, तसेच हर घर तिरंगा जिल्हा संयोजक, बूथ सशक्तीकरण अभियान राबविले, यामुळे आगामी काळात फलटण तालुक्यासह माढा लोकसभा मतदारसंघात बूथ सशक्तिकरण अभियान, सरल ॲप चे काम पूर्ण करणे, तसेच त्यांचे सर्व आमदार, नेते, मंडळ अध्यक्ष, पदाधिकारी, यांचे संबंध चांगले असल्याने यांच्यामध्ये समन्वय ठेवणे व निवडणुकीच्या दृष्टीने पक्ष संघटना बळकट करणे हे काम त्यांना करावे लागणार आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रात पक्ष संघटना बळकट करण्यासाठी त्यांचं योगदान मोठे राहील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
प्रदेश कार्यकारणी व निवड झाल्याबद्दल खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर, राज्यसभा खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार श्रीमंत छत्रपती श्रीमंत राजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील, माळशिरसचे आमदार राम सातपुते, माढा लोकसभा प्रभारी मा. आमदार प्रशांत परिचारक, संघटन पश्चिम महाराष्ट्र संघटन महामंत्री मकरंद भाऊ देशपांडे, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, सोलापूर जिल्हा संघटक सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील, जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या सौ. जिजामाला नाईक निंबाळकर, फलटण नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते समशेर दादा नाईक निंबाळकर, अँड नरसिंह निकम, युवा नेते धनंजय साळुंखे पाटील, युवा नेते अभिजीत नाईक निंबाळकर, गटनेते अशोकराव जाधव, शहराध्यक्ष अमोल सस्ते, मंडल अध्यक्ष बजरंग गावडे, यांच्यासह भारतीय जनता पार्टीच्या विविध पदाधिकारीनी विशेष अभिनंदन केले आहे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रदेश कार्यकारणीत १६ उपाध्यक्ष ,१६ चिटणीस ६४ लोकांची कार्यकारणी सदस्य तसेच विशेष निमंत्रित सदस्य व निमंत्रित सदस्यांचा समावेश आहे या खेरीज २८८ विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक आणि ७०५ मंडला चे प्रभारी यांची नियुक्ती करण्यात येणार आहे असे बावनकुळे नमूद केले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : आनंद पवार