मी दोषी असेल तर फाशी द्या; गोरेंचा मोठा खुलासा या नेत्यांच्या विरोधात केली हक्कभंगाची मागणी..

66
If I am guilty, hang me; Jai Kumar Gore's big disclosure demanded a violation of rights against these leaders.
अशातच आता मंत्री गोरे यांनी खासदार संजय राऊत आणि आमदार रोहित पवार व एका यूट्यूब चॅनेलच्या पत्रकरावर विशेषाधिकार हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला आहे.

Jaykumar Gore Disclosure: भाजपचे आणि महाराष्ट्राचे ग्रामविकास व पंचायती राज विभागाचे मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर महिलेला विचित्र फोटो पाठवल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला होता. त्यामुळे संपूर्ण राज्यात जय कुमार गोरेंविषयी वातावरण चांगलेच पेटून उठले होते. अशातच आता मंत्री गोरे यांनी खासदार संजय राऊत आणि आमदार रोहित पवार व एका यूट्यूब चॅनेलच्या पत्रकरावर विशेषाधिकार हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला आहे.

काय म्हणाले जयकुमार गोरे

खासदार संजय राऊत यांनी मध्यमांसमोर जाणीवपूर्वक बदनामी केली आहे. त्यामुळे त्यांनी माझा व सभागृहाचा विशेषाधिकार भंग करून न्यायालयाचा अवमान केला. म्हणून मी सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडत आहे. असे जयकुमार गोरे यांनी विधानसभेत सांगितले.

२०१७ मधील सातारा न्यायालयातील प्रकरण ४७९ चा आधार घेऊन त्यांनी मिडियाच्या माध्यमातून माझ्यावर आक्षेपार्ह भाषा वापरुन गंभीर आरोप केले आणि माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला. राज्याचा मंत्री म्हणून सभागृहात काम करताना मला चुकीच्या टिकेला तोंड द्यायला लागले. त्यांनी सभागृहाच्या कामकाजवर परिणाम व्हावा यासाठी जाणीवपूर्वक ही कृती केली आहे. सदर गुन्ह्यात न्यायालयाने मला २०१९ मध्ये मुक्तता दिली. तरीही विविध प्रसारमाध्यमांसमोर माझी बदनामी केली असून त्यांनी न्यायालयाचा अवमान केला आहे.

दोषी असल्यास फाशी द्या !

जयकुमार गोरे म्हणाले की, जर दोषी असेल तर मला फाशी द्या. पण अशा पद्धतीने अर्ज देण, प्लान करणं, चौकशी केल्यावर संबधित सांगतात की, मी अर्ज केला नाही. यांची चौकशी झालीच पाहिजे. अशी मागणी गोरे यांनी केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी,प्रथमेश पाटणकर

हेही वाचा : महायुती सरकारचा आणखी एक मंत्री गोत्यात ; संजय राऊत म्हणाले त्यांच्यासारखा विकृत..,

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा