मुंबई, ७ ऑगस्ट २०२१: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने JEE मेन जुलै २०२१ परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. जेईई मेन्स वेबसाईट jeemain.nta.nic.in वर निकालाची लिंक अॅक्टिव्ह झाली आहे. एनटीएनं २०, २२, २५ आणि २७ जुलै रोजी जेईई मेन परीक्षा तिसऱ्या सत्राची परीक्षा आयोजित केली होती. सुमारे ७.०९ लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं दिली. NTA ने भारतातील ३३४ शहरे आणि ८२८ केंद्रांवर JEE मुख्य परीक्षा घेतली होती. ने 5 ऑगस्ट रोजी तिसऱ्या टप्प्यातील JEE मुख्य परीक्षेची फायनल अन्सर की जारी केली होती.
यावर्षी एप्रिलमध्ये ही परीक्षा होणार होती. पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे ती पुढे ढकलण्यात आली. यानंतर, तिसऱ्या टप्प्यातील JEE मुख्य परीक्षा २० जुलै, २२, २५ आणि २७ जुलै २०२१ रोजी घेण्यात आली. त्याच वेळी, पूरग्रस्त भागातील उमेदवारांसाठी परीक्षा ३ आणि ४ ऑगस्ट रोजी घेण्यात आली.
जेईई मेनचा निकाल कसा पाहायचा?
१: निकाल तपासण्यासाठी प्रथम अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर भेट द्या.
२: वेबसाइटवर दिलेल्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
३: तुमचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख सबमिट करून लॉगिन करा.
४: तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
५: निकाल डाऊनलोड करुन त्याची प्रिंट आऊट घ्या
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे