जेईई-मेन्स निकाल: २४ विद्यार्थ्यांनी मिळवले १०० टक्के गुण

नवी दिल्ली, १२ सप्टेंबर २०२०: अभियांत्रिकी अभ्यासक्रमांसाठी संयुक्त प्रवेश परीक्षा-मुख्य (जेईई-मेन्स) चा संयुक्त निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. यात २४ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळविले आहेत, ज्या विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळालेले आहेत त्यातील आठ विद्यार्थी तेलंगाना मधील आहेत. दिल्लीतील पाच, राजस्थानचे चार, आंध्र प्रदेशचे तीन, हरियाणाचे दोन आणि गुजरात आणि महाराष्ट्रातील प्रत्येकी एक एक विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले आहेत.

१ जानेवारीपासून ते ६ सप्टेंबर या दरम्यान जेईई-मेन्सच्या परीक्षा घेण्यात आल्या. शुक्रवारी दोन्ही परीक्षांचे निकाल संयुक्तपणे जाहीर करण्यात आले. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर परीक्षेच्या वेळी शारीरिक अंतरांसह सर्व खबरदारीच्या उपायांचे काटेकोरपणे पालन केले गेले. परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांच्या प्रवेश व बाहेर जाण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. गेटवर सॅनिटायझर्स देण्यात आले आणि मास्क देखील वितरीत करण्यात आले.

आयआयटी आणि एनआयटी सारख्या अभियांत्रिकी संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी घेण्यात आलेल्या या परीक्षेसाठी ८.५८ लाख उमेदवारांनी नोंदणी केली होती, परंतु केवळ ७४ टक्केच परीक्षेला बसले. ओडिशा, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या सरकारांनी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर पोहोचण्यासाठी वाहतुकीचे साधन उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. याशिवाय आयआयटीच्या माजी आणि विद्यमान विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रांवर पोहोचण्यासाठी गरजू विद्यार्थ्यांना वाहतुकीची साधने उपलब्ध करून देण्यासाठी पोर्टल सुरू केले होते.

कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर जेईई-मेन्स आणि राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा (एनईईटी) पुढे ढकलण्याची मागणीही उपस्थित केली गेली होती, परंतु यासंदर्भात दाखल केलेली याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली. सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की विद्यार्थ्यांची मौल्यवान वर्षे वाया घालवू शकत नाहीत. जेईई-मेन्सच्या पेपर -१ आणि पेपर -२ च्या निकालाच्या आधारे २.४५ लाख विद्यार्थी जेईई-एडवांस मध्ये शामील होऊ शकतील. ही परीक्षा २७ सप्टेंबरला होणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा