Jeep च्या सर्वात महागड्या SUV ची भारतात होणार ग्रॅण्ड एन्ट्री

नवी दिल्ली, २९ ऑक्टोंबर २०२२ : New Jeep Grand Cherokee भारतीय ऑटोमोबाईल बाजारात जीप इंडिया आपली नवीन कार लॉन्च करणार आहे. ही कार भारतात ११ नोव्हेंबर रोजी लॉन्च होणार असून ही जीप इंडियाची सर्वात महागडी SUV कार असल्याचे सिद्ध होईल. जीपच्या या आगामी कारचे नाव २०२२ Grand Cherokee असे आहे. ही पाचव्या जनरेशनची एसयूव्ही कार आहे. अमेरिका बेस्ट ही कंपनी आपली २०२२ ग्रँड चेरोकी सीबीयू (कम्प्लीटली बिल्ट युनिट) द्वारे भारतात आणेल. भारतात jeep कार निर्मात्या कंपनीच्या अनेक कार आहेत, ज्यांची नावे कंपास, रॅंगलर, मेरिडियन आहेत आणि आता या महागड्या SUV कारचाही या यादीत समावेश होणार आहे.

२०२२ Cherokee वैशिष्ट्ये-

jeep कंपनी भारतात नवीन ग्रँड चेरोकी एसयूव्ही लाँच करण्यासाठी सज्ज झाली आहे. या कारमध्ये अनेक चांगले फिचर्स आहेत अधिक तपशील आहेत. ही एक प्रीमियम दर्जाची कार आहे.

२०२२ ग्रँड चेरोकीमध्ये तीन इंजिन आहेत- या कारमध्ये ५.७-लिटर V8 इंजिन आहे, जे ३५७ bhp पॉवर जनरेट करू शकते. तर ५२८ Nm चा पीक टॉर्क जनरेट होऊ शकतो. यासोबतच यात २.०-लिटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन ३७५ bhp पॉवर आणि ६३७ Nm कमाल टॉर्क जनरेट करू शकते. तिसर्‍या इंजिन पर्यायाखाली, 3.6 लीटर V6 पेट्रोल इंजिन उपलब्ध आहे, जे 294 bhp पॉवर आणि 348 Nm टॉर्क जनरेट करू शकते.

२०२२ ग्रँड चेरोकीचे डिझाइन-

२०२२ ग्रँड चेरोकीच्या डिझाईनबद्दल बोलायचे झाल्यास, ते जुन्या मॉडेलसारखेच दिसते, परंतु काही वेगळे बदल आहेत. शार्प लाइन आणि अपडेटेड फ्रंट ग्रिल नवीन व्हर्जनमध्ये देण्यात आले आहेत. यामध्ये सेव्हन स्लेट जीप ग्रिल, स्लीकर एलईडी हेडलाइट्स आणि एलईडी टेल लाइट्सचा वापर करण्यात आला आहे.

२०२२ ग्रँड चेरोकीचे आतील भाग- २०२२ ग्रँड चेरोकीला जुन्या मॉडेल पेक्षा अधिक जागा आणि चांगली वैशिष्ट्ये आहेत. या जीप मध्ये १०.२५ इंच टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे, जी ऍपल कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटोला सपोर्ट करते. यात इनबिल्ट 4G कनेक्टिव्हिटी आहे. यामध्ये एकूण १७ स्पीकर वापरण्यात आले आहेत.

२०२२ ग्रँड चेरोकीची अपेक्षित किंमत-

ग्रँड चेरोकीच्या जुन्या व्हर्जनची भारतात किंमत ७५ लाख रुपये ते १.१४ कोटी रुपये एक्स-शोरूम आहे, आणि ती कार आता बंद करण्यात आली आहे. तर अमेरिकेत २०२२ ग्रँड चेरोकी एसयूव्हीची किंमत ३५,००० डॉलर्स म्हणजेच जवळपास २६ लाख रुपये इतकी आहे. भारतात Jeep Grand Cherokee ची किंमत थोडी जास्त असेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा