जेफ बेझोस यांच्या पूर्व पत्नीने केले २.७ अब्ज डॉलर्स दान, या भारतीय संस्थांना झाला फायदा

पुणे, १७ जून २०२१: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती जेफ बेझोस यांची पूर्व पत्नी मॅकेन्झी स्कॉट यांनी अनेक धर्मादाय मोहिमेसाठी २.७ अब्ज डॉलर्स (सुमारे १९,८१० कोटी रुपये) दान केले आहेत.  या देणगीचा फायदा भारतासह जगभरातील सुमारे २८३ संस्थांना झाला आहे.
 बेजोसपासून घटस्फोट घेतलेल्या मॅकेन्झी त्यांच्या परोपकारी कामांसाठी ओळखल्या जातात.  जुलै २०२० पासून त्यांनी ८.५ अब्ज रुपये दिले आहेत.  त्यांच्या ताज्या देणग्यामुळे गिव्ह इंडिया, गुंज, अंतरा फाउंडेशन यासारख्या भारतीय संस्थांनाही मदत झाली.
 आतापर्यंत दिली एवढी देणगी
 मॅकेन्झी यांनी वर्ष २०१९ मध्ये जेफ बेझोसशी घटस्फोट घेतला आणि डॅन जावेट यांच्याशी लग्न केले.  डॅन जावेट यांच्याशी लग्न केल्या नंतरची त्यांची ही पहिली चॅरिटी मोहीम आहे.  बेझोसपासून घटस्फोटानंतर मॅकेन्झी स्कॉट यांना ॲमेझॉन मध्ये ४ टक्के हिस्सा मिळाला, ज्याची किंमत सुमारे ६० अब्ज डॉलर्स आहे.  त्या जगातील सर्वात सक्रिय दानशूर लोकांपैकी एक आहेत.  गेल्या वर्षी केवळ एका वर्षात सर्वाधिक दान देण्याचा विक्रम त्यांनी केला आहे.
 या भारतीय स्वयंसेवी संस्थांना फायदा
 या देणगीचा फायदा गिव इंडिया, गुंज, अंतरा फाउंडेशन यासारख्या भारतीय संस्थांनाही झाला आहे.  गुंज ही एक संस्था गरीबी दूर करण्यासाठी आणि वंचितांना सन्माननीय जीवन जगण्यासाठी काम करणारी संस्था आहे.  याचे संस्थापक अंशु गुप्ता असून त्यांना मॅग्सेसे पुरस्कारही मिळाला आहे.
 गिव्ह इंडिया ही गरीबी निर्मूलनामध्ये गुंतलेली एक स्वयंसेवी संस्था आहे, जी श्रीमंतांकडून पैसे गोळा करते आणि गरिबांच्या उद्धारामध्ये गुंतवणूक करते.  २० लाखाहून अधिक देणगीदार या समुदायाशी संबंधित आहेत.  अंतरा फाउंडेशन ही एक भारतीय संस्था आहे जी सार्वजनिक आरोग्य आणि पोषण उपायांमध्ये व्यस्त आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा