जेजुरी, १५ फेब्रुवारी २०२४ : पुरंदर तालुक्यातील जुनी जेजुरी येथील विटभट्टी परिसरातील वाहनातील दोन बॅटरी चोरताना दोन चोरट्यांना काल जेजुरी पोलिसांनी पकडल आहे. एमआयडीसी चौकात नीरा येथील दोन चोर मुद्देमाला सहित पोलिसांच्या हाती लागलेत. या प्रकरणी संशयित आरोपी अक्षय दिलीप शेवाळे (वय २३) आणि तेजाब जमीर खान (वय 35) रा. निरा, ता .पुरंदर, जि. पुणे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. सदर कारवाई पोलीस निरीक्षक दिलीप वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली असून पुढील तपास सुरु आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : राहुल शिंदे