गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा जेजुरीत भाजपाच्यावतीने दूध वाटून केले आंदोलन

जेजुरीत भाजपाच्यावतीने दूध वाटून केले आंदोलन

पुरंदर, दि २ ऑगस्ट २०२० : जेजुरी येथे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस सरकारचा निषेध करीत पुरंदर तालुका भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या वतीने दूध वाटून आंदोलन करण्यात आले .

भाजपाच्या वतीने सरकार विरोधात शेतक-यांच्या दुधाला योग्य भाव मिळावा यासाठी आंदोलन सुरु असून शनिवार दि १ रोजी जेजूरी येथील छत्रपती शिवाजी चौकात पुरंदर तालुका,जेजुरी शहर भाजपा,रासप,व मित्र पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. आंदोलनापूर्वी लोकमान्य टिळक,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .

राज्यातील आर्थिक दृष्ट्या पिचलेल्या शेतकऱ्यांना लिटर मागे १० रुपये शासनाने अनुदान द्यावे,दुध भुकटीसाठी ५० रुपये अनुदान द्यावे यासाठी संपूर्ण राज्यभर हे आंदोलन छेडण्यात आले असून,सरकारने याकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन तीव्र केले जाईल असे भाजपचे पदाधिकारी श्रीकांत ताम्हाणे यांनी सांगितले .

यावेळी पुरंदर तालुका भाजपाचे अध्यक्ष आर एन जगताप पदाधिकारी निलेश जगताप, श्रीकांत ताम्हाणे , श्रीकांत थिटे, माहिलाध्यक्षा अलका शिंदे, जेजुरी शहर भाजपचे अध्यक्ष सचिन पेशवे, पदाधिकारी नागनाथ झगडे, गणेश भोसले आदी कार्यकर्ते उपस्थित होते .

न्युज अनकट प्रतिनिधी : राहुल शिंदे

error: Content is protected !!
Exit mobile version