झगडे कुटुंबाच्या विवाहातून समस्त समाजाला मिळाला आदर्श

कर्जत, ६ मे २०२०: संपुर्ण जगामध्ये कोरोना या रोगाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. कोरोना या महा संकटातून भारत ही सुटलेला नाही. त्याचा परिणाम म्हणजे संपुर्ण महाराष्ट्र मध्ये कोरोना या रोगाचे सर्वाधिक रूग्ण पाहण्यास मिळत आहेत. या परिस्थिती वर मात करण्यासाठी सरकारने देशात ताळेबंदची घोषणा केली आणि मग त्याचा परिणाम नागरिकांच्या जीवनावर होणे साहजिकच आहे.

त्या मुळे लग्न समारंभावर त्याचा जास्त परिणाम पाहण्यास आपल्याला मिळत आहे. विवाह हा सोळा संस्कारापैकी महत्त्वाचा संस्कार होय, त्या मुळे महाराष्ट्र भर मोठ्या थाटामाटात विवाह सोहळे साजरे होत असतात.

कर्जत तालुक्यातील जलालपूर येथील झगडे कुटुंब हे या सर्वात वेगळे ठरलं आहे, सविस्तर माहिती अशी की, ५ मे रोजी दुपारी १२ वा ऋषीकेश झगडे आणि कोमल फरांदे यांचा विवाह सोहळा पार पडला. अगदी सोप्या पद्धतीने नववधू नी सुरक्षित अंतर ठेवत ब्राह्मण आणि घरातील मान्यवरांना सॅनिटायजर व मास्कचे वाटप केले आणि निसर्गाशी नाळ जोडली असल्यामुळे वृक्षारोपण ही केले. त्या नंतर सर्वांनी हातावर सॅनिटायजर तोंडावर मास्क लावून विवाह अत्यंत साध्या पध्दतीने पूर्ण केला. या विवाह वेळी वर – वधू कडील आई वडिल मामा आणि ठराविक वराडी मंडळीच्या उपस्थित स्वताःच्याच घरीच विवाह सोहळा पार पडला. आशा प्रकारे झगडे आणि फरांदे यांनी समाजाला आदर्श घडवून दिला.

न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा