गोल पोस्ट स्पॉटलाइट सिनेमा जॉनच्या ‘अटॅक’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर

जॉनच्या ‘अटॅक’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर

मुंबई: बॉलिवूडमधी प्रसिद्ध अभिनेता जॉन अब्राहमची प्रमुख भूमिका असलेला ‘अटॅक’ हा चित्रपट पुढील वर्षी १४ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.
पागलपंती चित्रपटानंतर आता जॉन लवकरच अटॅक या ॲक्शन चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. प्रदर्शनाच्या तारखेविषयी चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करत याची माहिती दिली आहे.
अटॅक या चित्रपटात जॉन सोबतच अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीस आणि रकुल प्रीत सिंह यांच्याही प्रमुृख भूमिका आहेत.
या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मी राज आनंद यांनी केले असून यामध्ये प्रेक्षकांना जॉनचे स्टंटस पहायला मिळणार आहेत.

error: Content is protected !!
Exit mobile version