जिल्हाधिकारी कार्यालयातील पत्रकावरील “त्या” मेसेजची चर्चा

पुणे : पुणे-सातारा रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी खेड-शिवापूर टोल नाक्यावर टोल भरू नये’ असा एक मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मसेजमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पत्राची एक फोटोप्रतही जोडण्यात आली आहे. मात्र, या मेसेजची सत्यता पडताळली असता जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अशा प्रकारचा कोणताही आदेश देण्यात आला नसल्याचे पुढे आले आहे.

तसेच, जिल्हाधिकारी कार्यालयाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला पाठविलेल्या पत्राचा अर्धवट भाग सोशल मिडीयावर पसरवून काही मंडळी नागरिकांची दिशाभूल करत असल्याचेही या माध्यमातून पुढे येत आहे.

त्या अर्धवट पत्रकात पुणे-सातारा रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या एम एच १२ आणि एम एच १४ पासिंगच्या वाहनांनी खेड-शिवापूर टोल नाक्यावर टोल भरू नये, हे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाने दिले आहेत.

या व्हायरल मेसेज मागची सत्यता तपासली असता, संबंधीत पत्र हे मूळ पत्रातील केवळ आर्धाच भाग आहे. मूळ पत्र हे जिल्हाधिकारी कार्यालयाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मुख्य प्रबंधक यांना पाठवले आहे. या पत्रात केवळ खेड-शिवापूर टोल नाका संदर्भाद आजवर झालेली आंदोलने, बैठका, तसेच, आंदोलक आणि विविध संघटनांनी केलेल्या मागण्यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे.

दरम्यान, खेड-शिवापूर टोल नाका संदर्भात सन २०११ मध्ये एक आंदोलन झाले होते. या आंदोलनात विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी सहभागी होते. या वेळी पुणे-सातारा टोल रोड कंपनी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि आंदोलनकर्ते लोकप्रतिनिधि यांच्यात एक बैठक पार पडली होती. या बैठकीत खेड-शिवापूर टोल नाका ज़ोपर्यन्त भोर तालुक्याच्या हद्दीबाहेर हलविला जात नाही, तोपर्यन्त एम एच १२ आणि एम एच १४ पासिंगच्या वाहनांकडून टोल घेण्यात येऊ नये, अशी जोरदार मागणी करण्यात आली होती.

मात्र, या पत्राचा संपूर्ण तपशील प्रसारीत न करता केवळ अर्धवट तपशील प्रसारीत करुन नागरीक, प्रवासी आणि वाहन चालक आदींची दिशाभूल केली जात असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या कोणत्याही मेसेजवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, अशी मागणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आली आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा