नवी दिल्ली: सोशल मीडिया दिग्गज अमेरिकन कंपनी फेसबुकने मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वात रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ग्रुप कंपनी जियो प्लॅटफॉर्म लिमिटेडमध्ये ९.९९ टक्के हिस्सा खरेदी करण्याचा करार केला आहे. कंपन्यांनी बुधवारी याची घोषणा केली. निवेदनात म्हटले आहे की, हा करार, ४३,५७४ कोटी ($ ५.७ अब्ज डॉलर्स) आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या टेलिकॉम नेटवर्क जिओमध्ये जिओ प्लॅटफॉर्म लिमिटेडचा १००% हिस्सा आहे.
निवेदनात म्हटले आहे की रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, जिओ प्लॅटफॉर्म लिमिटेड (जिओ प्लॅटफॉर्म) आणि फेसबुकने फेसबुकद्वारे जियो प्लॅटफॉर्ममध्ये ४३,५७४ कोटी रुपयांच्या गुंतवणूकीचे वचन दिले आहे. या करारामध्ये जिओ प्लॅटफॉर्मचे मूल्य ४.६२ लाख कोटी रुपये ($ ६५.९५ अब्ज डॉलर) इतके आहे.
अशाप्रकारे जिओ प्लॅटफॉर्मवर फेसबुकचा वाटा ९.९९ टक्के असेल. या करारानंतर जिओ प्लॅटफॉर्ममध्ये फेसबुकचा लहान भागधारकांचा मोठा वाटा असेल. यानंतर ही कंपनी आता देशातील ५ मोठ्या कंपन्यांमध्ये समाविष्ट झाली आहे,
फेसबुकने या गुंतवणूकीबद्दल म्हटले आहे की, “ही गुंतवणूक भारताबद्दलची आमची व्यावसायिक बांधिलकी दर्शवते. जिओने भारतात आणलेल्या मोठ्या बदलांमुळे आम्ही उत्सुक आहोत. चार वर्षात रिलायन्स जिओ जवळपास ३८ कोटी लोकांना ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आणण्यात ते यशस्वी झाले आहेत. म्हणूनच आम्ही जिओच्या माध्यमातून भारतातील अधिकाधिक लोकांशी संपर्क साधण्यासाठी वचनबद्ध आहोत. “