जालना १४ जुलै २०२४ : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना अणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने जालन्यात उद्या दि. १५ जुलै रोजी रोजगार मेळावा आयोजीत करण्यात आलाय. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत ‘जागतिक युवा कौशल्य दिना’निमित्त पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी रोजगार मेळाव्यास उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन जालना कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता सहायक आयुक्त भुजंग रिठे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
मेळाव्यात दहावी बारावी, आय.टी.आय., बी.ए., बी.कॉम, बी.एस सी., एम.कॉम, डिप्लोमा व बी.ई., डिप्लोमा अॅग्री, बी.एस सी. अॅग्री, एम.एस.सी. अॅग्री, एम.बी.ए, एम.बी.ए., एम.एस.डब्यु. इत्यादी पात्रताधारक नोकरी इच्छुक महिला उमेदवारासाठी एकूण ५५१ रिक्त पदे उपलब्ध असून मुलाखतीसाठी विविध १४ कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. तसेच, कौशल्य विकास प्रशिक्षण व स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य करणा-या शासनाच्या विविध महामंडळांचे स्टॉल्स लावून विविध योजनांचे मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचं कळविण्यात आलंय.
न्यूज अनकट प्रतिनिधी : विजय साळी