कमल नयन बजाज महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना नोकऱ्या उपलब्ध

पुणे, दि. १३ ऑगस्ट २०२०: बारामतीचे विद्या प्रतिष्ठानचे कमल नयन बजाज अभियांत्रिकी महाविद्यालयात गेल्या दोन वर्षात महाविद्यालयातील ५५० विद्यार्थ्यांना ऑन व ऑफ कॅम्पस प्लेसमेंटद्वारे चांगल्या नोकऱ्या मिळाल्या आहेत. आर्थिक मंदीच्या काळातही महाविद्यालयाने कॅम्पस प्लेसमेंटद्वारे विद्यार्थ्यांना नोकरीच्या दर्जेदार संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. नामवंत कंपन्यात प्लेसमेंट झाल्यास महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट डिपार्टमेंटच्या कामगिरीचा आलेख चढता राहिला आहे.

बारामती शहरातील कमल नयन बजाज अभियांत्रिकी महाविद्यालयात काही प्रमुख मल्टिनॅशनल व नॅशनल कंपन्या मागील २ वर्षांपासून प्लेसमेंट द्वारे विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळाल्या आहेत. यामध्ये इन्फोसिस ५८, टीसीएस ५५, अटॉस सिन्टेल२१, भारत फोर्ज आणि कल्याणी टेक्नोफोर्ज २०, ऍक्सेंचर १५, कॉग्निझंट १४, टाटा टेक्नॉलॉजिज १३, अँम्डॉक्स १४, विप्रो ९, कॅपजेमिनी ११, राजा सॉफ्टवेअर लॅब्स ७, एल अँड टी इन्फोटेक ६, फिसर्व ६, केपीआयटी ५, केएसबी पंप्स ५, आईबीएम ५. या नामवंत कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. कमल नयन बजाज महाविद्यालय बारामती सारख्या ग्रामीण भागात असूनही महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मेहनत करून चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळवल्या आहेत.

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना बायजूस, अपग्रॅड आणि टॉपर या कंपन्यांनी प्रत्येकी १० लाख रुपये वार्षिक पगाराच्या नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या आहेत. महाविद्यालयाच्या ६ विद्यार्थ्यांना १० लाखांपर्यंत तर ५० विद्यार्थ्यांना ४ लाखाच्या नोकऱ्या मिळाल्या आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी – अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा