जो बिडेन यांच्या विजयाचं भारतीय उद्योगानं केलं स्वागत

नवी दिल्ली, ९ नोव्हेंबर २०२०: अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत जो बिडेन यांच्या विजयाचं भारतीय उद्योगानं स्वागत केले आहे. ते म्हणाले की लोकशाही प्रक्रियेने बदलासाठी मतदान केलं आहे. त्याचबरोबर बिडेन यांच्या नेतृत्वात भारत-अमेरिका संबंध आणि सहकार्यात आणखी बळकटी येईल, अशी अपेक्षा या उद्योगानं व्यक्त केली.

इंडस्ट्री बॉडी सीआयआयचे महासंचालक चंद्रजित बॅनर्जी यांनी निवडून आलेले अध्यक्ष बिडेन आणि निवडलेल्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांचं अभिनंदन करताना म्हणाले, “आम्ही पुन्हा एकदा अध्यक्ष बिडेन आणि त्यांच्या प्रशासनाच्या सहकार्याची अपेक्षा करीत आहोत”.

ते म्हणाले की, कोविड -१९ मध्ये आलेल्या अडथळ्यांपूर्वी २०१९ मध्ये वस्तू आणि सेवांमधील द्विपक्षीय व्यापार सुमारे १५० अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचला. आम्हाला आशा आहे की येत्या काही वर्षांत यात वाढ होईल.

बॅनर्जी म्हणाले, “नव्या युगात जास्तीत जास्त सहयोगाने नवीन ऊर्जेचा संचार करून आपण त्यात ५०० अब्ज डॉलर्सचे सामायिक लक्ष्य गाठू शकतो.” ते म्हणाले की ऊर्जा आणि हरित अर्थव्यवस्था अशी क्षेत्रे आहेत ज्यात दोन्ही देश परस्पर संबंध सुधारू शकतात.

अमेरिका भारत व्यापार परिषदनं म्हटलं की, बिडेन यांनी बराक ओबामा प्रशासनात अमेरिका भारत यांच्यातील संबंध अधिक बळकट करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. परिषदेच्या म्हणण्यानुसार ते जो बिडेन आणि कमला हॅरीस यांच्या सोबत काम करण्यास उत्साहित आहे. परिषदेने म्हटलं की, “आम्हाला पूर्ण विश्वास आहे की बिडेन यांच्या नेतृत्वात अमेरिका भारत आर्थिक भागीदारी आपली पूर्ण क्षमता गाठू शकेल. यामुळे दोन्ही देशांमधील नागरिकांना उत्तम संधी चालून येतील.”

जेएसडब्ल्यू ग्रुपचे अध्यक्ष व एमडी सज्जन जिंदल यांनी ट्विट केलं की, “एका लोकशाही प्रक्रियेनं व्यवस्थेत बदल करण्यासाठी हे मतदान केलं आहे. याबद्दल अमेरिकन समुदायाचं अभिनंदन, ज्याने हे सुनिश्चित केले की एखाद्या कठीण बाह्य वातावरणात लोकशाही प्रक्रियेशी कोणतीही तडजोड होऊ शकत नाही. तसेच, जेएसपीएलचे अध्यक्ष नवीन जिंदल यांनीही ट्विट करुन बिडेन आणि हॅरिस यांचं अभिनंदन केलं. ते म्हणाले की ही आशा आहे की यामुळं भारत आणि अमेरिकेमधील सहकार्य आणि संबंध दृढ होतील.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा