हॉलिवूड, १३ जुलै २०२० : प्रसिद्ध अभिनेत्री आणि जॉन ट्रॅव्होल्टा यांची पत्नी कैेली प्रेस्टन यांचे वयाच्या ५७ व्या वर्षी कर्करोगामुळे निधन झाले आहे. हि माहिती स्वत: ट्रावोल्टा यांनी इंन्स्टाग्रामवर पोस्ट करत सांगितली. त्यात ते म्हणता की, माझी सुंदर पत्नी केैलीने स्तनाच्या कर्करोगासह दोन वर्षांची लढाई गमावली आहे. बर्याच लोकांच्या प्रेमापोटी आणि पाठिंब्याने तिने हा लढा धैर्याने दिला असेही ते म्हणाले.
या सुंदर जोडप्याला जवळजवळ २ वर्षे झाली होती. प्रेस्टनच्या कारकीर्दीत दोघांनी मिळून , डस्क टिल डॉनपासून, जेरी मॅग्युअर आणि द कॅट इन द हॅट मध्ये भूमिका केल्या होत्या . बॅटलफिल्ड अर्थ आणि गोट्टी यातही तिने आपल्या पतीबरोबर काम केले होते.
जॉन पुढे म्हणाले की आपली आई गमावलेल्या माझ्या मुलांसाठी मी त्यांच्या सोबत राहणार आहे. मी त्यांच्या बरोबर वेळ घालवणार आहे.त्यामुळे आमच्याकडून कुठल्या गोष्टीची माहीती नाही मिळाली तर आधीच तुम्ही आम्हाला माफ करा.
ट्रॅव्होल्टा यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले होते की, ज्याने आपल्या पत्नीची तीच्या आजारपणात काळजी घेतली आहे, तसेच तिच्या शेजारी राहिलेले तिचे मित्र आणि प्रियजनांचे मी आभार मानतो .
न्यूज अनकट प्रतिनिधी