जुबिलंट लाईफ सायन्सेसतर्फे कोरोनावरील ‘जुबी-आर’ हे औषध भारतात सादर

पुरंदर, ७ ऑगस्ट २०२०: पुरंदर मधील‌ नीरा येथे असलेल्या जुबिलंट लाईफ सायन्सेसची उपकंपनी असलेल्या जुबिलंट जेनेरिक्स लिमिटेडतर्फे जुबी -आर हे रेम्डेसिव्हीर औषध भारतीय बाजारपेठेत सादर करण्यात आले आहे. सध्याच्या कोवीड १९ या आजारावर प्रभावी औषध असल्याचा दावा कंपनीकडुन‌ करण्यात येत आहे.

अमेरिकन गीलीट या कंपनी बरोबर‌ करार करून ज्युबिलंटने औषध भारतात उत्पादित करायला‌ सुरवात केली असून, त्याला भारत सरकारची मान्यता आहे. अँटीव्हायरल ड्रग रीमॅडिव्हायर (“जुबी-आर”) तयार आणि बाजारपेठत विक्रीसाठी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय) कडून मान्यता मिळाली. असे कंपनीने दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. हे औषध इंजेक्शन स्वरूपात असून त्यामुळे कोवीडचा रुग्ण बरा होतो. याचा वापर सध्या अमेरिकेत होत असल्याचे कंपनीकडून सांगण्यात येत आहे. या औषधाची सवलत मूल्य १०० एमजी वायलसाठी ४७०० रुपये आहे. कंपनी तर्फे जुबी-आर हे औषध कोविडवर उपचार करणार्‍या १००० हून अधिक रुग्णालयांत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याच बरोबर जगातील १२७ देशात हे औषध निर्यात केले जाणार आहे. भारतामध्ये दारिद्रय रेषेखालील आणि गरजू रुग्णांना हे औषध उपलब्ध व्हावे यासाठी जुबिलंट समुहाची ‘विना नफा’ तत्त्वावर काम करणारी संस्था जुबिलंट भारतीया फौंडेशनतर्फे ‘जुबी-आर’च्या वितरणासाठी विविध कार्यक्रम राबवले जाणार आहेत.

याबाबत ज्युबीलंट फार्मा लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शाम एस. भारतीया आणि सहअध्यक्ष हरी भारतीया म्हणाले की, एवढ्या कमी काळात अशा प्रकारचे उत्पादन विकसित करणे हे आमच्या संशोधन व विकास विभागाची आणि निर्मिती विभागाची सक्षमता, तसेच आघाडीची हेल्थकेअर सोल्युशन्स पुरविण्याची कटिबध्दता दर्शविते.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा