गोल पोस्ट इतर उड्या मारत मारत हरीण आले चक्क वर्दळीच्या रस्त्यावर !

उड्या मारत मारत हरीण आले चक्क वर्दळीच्या रस्त्यावर !

पुणे, १० ऑक्टोबर २०२२: अलिकडे मनुष्य आणि वन्यप्राणी एकमेकांसमोर आल्याचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या उत्सुकतेने पाहिला जात आहे. यामध्ये एक हरीण उड्या मारत वेगाने रस्ता ओलांडत आहे.

आयएफएस अधिकारी सुसांता नंदा यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये एक हरीण हिरव्या मैदानातून उड्या मारत रसत्यावर येताना दिसत आहे. हरीण उड्या मारत मारत रस्त्याजवळ आला आणि त्याने मोठी उडी घेत रस्ता ओलांडला. यावेळी रस्त्यावर वर्दळ होती. वाहनांची ये जा सुरू होती. मात्र कसलीही भिती न बाळगता किंवा माघारी न जाता हरिणाने वेगाने रस्ता ओलांडला. हरिणाच्या या जबरदस्त उड्यांकडे रस्त्यावरचे प्रवाशी पाहतच राहिले आणि ते वेगाने निघून गेले.

या व्हिडिओला आतापर्यंत १५ हजारांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच व्हिडिओला ८०० पेक्षा अधिक लाईक्स मिळाले आहेत. हा व्हिडिओ नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे. काहींनी हे दुर्मिळ दृश्य असल्याचे म्हटले आहे. हरिणाचा वेग आणि त्याने मारलेल्या उड्या पाहून अनेक जण हैराण झाले आहेत.

व्हिडिओवर नेटकऱ्यांनी भरपूर प्रतिक्रिया दिल्या आहेत. वर्दळीच्या रसत्यावरून हरीण जात असल्याचे पाहून एकाने आपल्यामुळे प्राणी आणि त्यांच्या निवासस्थानाला त्रास होत असल्याची खंत व्यक्त केली आहे. तर एका युजरने हरणाला वाहनांमुळे इजा झाली नसल्याचे सांगत समाधान व्यक्त केले आहे. तर दुसऱ्या एका युजरने तो घाबरला असेल असे अंदाज व्यक्त केला. तर काही युजरने हरिणाच्या उडीचे कौतुक केले आहे. तर एकाने मनापेक्षाही हरिणाची गती अधिक असल्याचे म्हटले.

न्यूज अनकट प्रतिनिधी – प्रज्ञा फाटक.

error: Content is protected !!
Exit mobile version