५० अल्पवयीन मुलांचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी ज्यूनिअर इंजिनीअरला अटक

लखनौ, १८ नोव्हेंबर २०२०: मागील काही महिन्यांपासून बांदा, चित्रकूट आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरातून बाल लैंगिक शोधणाच्या तक्रारी येत आहेत. या तक्रारींची दखल घेत केंद्रीय तपास संस्था – सीबीआयने (सीबीआय) १०-१५ वयोगटातील ५० अल्पवयीन मुलांचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी एका बड्या अधिकाऱ्याला अटक केली आहे. संबंधित अधिकारी उत्तर प्रदेशच्या सिंचन विभागात कनिष्ठ अभियांत्रिक (ज्यूनिअर इंजिनीअर) म्हणून कार्यरत आहे.

सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण तर केलेच, सोबत याचे अश्लील व्हिडीओ आणि इतर आक्षेपार्ह माहिती डार्कवेबवर अपलोड केली. मुलांच्या या अश्लील व्हिडीओचं रेकॉर्डिंग मोबाईल, लॅपटॉप, स्पाय कॅमेरा आणि पेन ड्राईव्हमध्ये ठेवण्यात आले होते.

आरोपी अनेक वर्षांपासून मुलांचं लैंगिक शोषण करत त्यांच्या व्हिडीओची विक्री करत होता. तसेच याबाबतचे नवे व्यवहारही करत होता. आरोपीच्या ईमेल आयडीवरुन आरोपी केवळ भारतीय नाही, तर अगदी परदेशी नागरिकांच्याही संपर्कात असल्याचं उघड झालंय.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा