जस्टीस लोया प्रकरणाची होणार पुर्नचौकशी

मुंबई : देशभर गाजलेल्या विशेष सीबीआय न्यायालयाचे जस्टीस बी. एच. लोया प्रकरणाची पुर्नचौकशी करण्यात येणार आहे. राज्य सरकारने तशी कारवाई सुरु केली असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. जस्टीस लोया यांचा २०१४ मध्ये संशयास्पद मृत्यू झाला होता. या हाय प्रोफाईल केस असलेल्या सोहराबुद्दीन फेक एन्काउंटर प्रकरणी सुनावणी जस्टीस लोया यांच्यासमोर होत होती. डिसेंबर २०१४ मध्ये नागपूरला लोया मित्राच्या मुलीच्या लग्नासाठी गेले असताना त्यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले होते.

याविषयी माहिती देताना अनिल देशमुख यानी सांगितले, की आमच्या सरकारकडून या प्रकरणाची पुर्न चौकशी केली जाणार आहे.
काही लोकांनी मला भेटून या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली. आवश्यकता भासल्यास मी त्यांची बाजू समजून घेणार आहे. या प्रकरणाची पुर्न चौकशी केली जाईल. लोया यांच्या कुटुंबीयांनी आपली भेट घेतली होती का? असे विचारण्यात आले असता त्यांनी मी याबाबत कोणतीही माहिती उघड करणार नाही अशी प्रतिक्रिया दिली.
लोया यांच्या मृत्यूनंतर सोहराबुद्दीन एन्काउंटर खटल्यातून अमित शहायांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. लोया यांचा मृत्यू नैसर्गिक नसून यामागे घातपात असल्याची शक्यता असल्याचा आरोप आजतागायत होत आहे. दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाने लोया यांचा मृत्यू हा नैसर्गिक होता असे सांगत या प्रकरणाची चौकशी करण्यास नकार दिला आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा