पुरंदर, पुणे २४ नोव्हेंबर २०२३ : पुण्यातील पुरंदर तालुक्यातील गुळूंचे येथील ज्योतिर्लिंगाची काटे बारस यात्रा उत्साहात संपन्न झाली. या यात्रेत भाविक ज्योतिर्लिंगावर आपली भक्ती दर्शवण्यासाठी तसेच आपले नवस पूर्ण करण्यासाठी, काट्यांच्या ढिगाऱ्यामध्ये उघड्या अंगाने उड्या मारत असतात. आज झालेल्या या काटे मोड यात्रेमध्ये सुमारे २५० भक्तांनी या काट्यांच्या ढिगाऱ्यामध्ये उड्या घेतल्या.
बारा दिवस चाललेल्या या यात्रेची आज काटे मोडून सांगता करण्यात आली. काटे-बारस यात्रेला शेकडो वर्षाचची परंपरा आहे. लोक या काट्यांच्या ढिगार्यामध्ये उड्या घेतात, मात्र आजपर्यंत कोणालाही फारशी दुखापत झाली नाही असे येथील ग्रामस्थ सांगतात. यावेळी हजारो भक्तांनी श्री ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले. माजी मंत्री विजय शिवतारे यांनी सुद्धा या यात्रेला उपस्थिती लाऊन भक्तांचे स्वागत केले.
न्यूज अनकट प्रतिनिधी : राहुल शिंदे