K-Beauty skincare craze in India: सौंदर्याच्या दुनियेत सध्या एकच चर्चा, ती म्हणजे ‘के-ब्युटी’ ची! मेकअपच्या जाळ्यात न अडकता, नैसर्गिक निखळ त्वचेची जादू अनुभवण्याची नवी क्रेझ भारतीय तरुणाईला चांगलीच भावली आहे. जणू काही कोरियामधून आलेलं ‘ग्लोइंग सिक्रेट’ आता सगळ्यांच्या ओठांवर आणि चेहऱ्यावर आहे! K-ड्रामा आणि K-पॉपच्या तालावर थिरकणाऱ्या या सौंदर्यशैलीने इथल्या तरुणाईच्या ‘ब्युटी गेम’ ला एकदम ‘नेक्स्ट लेव्हल’ ला नेऊन ठेवलंय!
‘काचेसारखी चकचकीत त्वचा’, ‘मधासारखी गोड आणि मुलायम’ आणि ‘ओलावा टिकून राहिलेला फ्रेश लुक’ – हे आता फक्त कोरियन स्टार्सचे ‘सिग्नेचर स्टाईल’ राहिलेले नाहीत, तर आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक तरुणीचं हे स्वप्न बनलंय. आणि या स्वप्नांना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्यांची सकाळ होते एका खास ‘स्किन केअर रिचुअल’ने आणि रात्र संपते त्वचेला लाड करत!
आजकालची ‘ब्युटी आर्मी’ चक्क ‘7-स्टेप’ नाही तर ’10-स्टेप’ पर्यंतचे ‘स्किन केअर चॅलेंज’ स्वीकारताना दिसतेय. पहिलं क्लींजिंग करून त्वचेवरची धूळ आणि प्रदूषण हटवायचं, मग टोनर लावून पीएच बॅलन्स करायचा, त्यानंतर एसेंस आणि सिरमच्या मदतीने त्वचेला आतून पोषण द्यायचं. आठवड्यातून एकदा तरी शीट मास्क लावून त्वचेला झटपट हायड्रेशनचा बूस्ट द्यायचा, डोळ्यांखालील नाजूक त्वचेसाठी खास आय क्रीम आणि सगळ्यात शेवटी मॉइश्चरायझर लावून ओलावा लॉक करायचा. आणि हो, दिवसा घराबाहेर पडताना सनस्क्रीन लावणं तर आता एकदम ‘मॅन्डेटरी’! ही फक्त काही प्रोडक्ट्सची लिस्ट नाही, तर स्वतःच्या त्वचेला दिलेला एक ‘लव्ह लेटर’ आहे, जे तरुण रोज लिहित आहेत!
तुमच्या ‘ब्युटी किट’मध्ये असायलाच हवी ही K-Beauty ‘टॉप लिस्ट’
- COSRX Advanced Snail 96 Mucin Power Essence: (स्नेल म्युसिन म्हणजे त्वचेसाठी एकदम ‘बाप’! लावल्यावर त्वचा होते एकदम स्मूथ आणि शायनी!)
- Laneige Water Sleeping Mask: (रात्री लावा आणि सकाळी फ्रेश ‘नो मेकअप’ लुक रेडी!)
- Innisfree Green Tea Seed Serum: (‘ग्रीन टी’चा पावर! त्वचेला देतो एकदम ‘रिफ्रेशिंग’ फील!)
- The Face Shop Rice Water Bright Foaming Cleanser: (तांदळाच्या पाण्याचे गुण! त्वचा होते एकदम ‘क्लीन अँड क्लियर’!)
- Klairs Supple Preparation Toner: (हा टोनर म्हणजे त्वचेसाठी ‘बेस्ट फ्रेंड’! करतो तिला शांत आणि हायड्रेटेड!)
आणि खरी गंमत तर आता आहे! हा ‘ग्लोइंग इफेक्ट’ फक्त चेहऱ्यापुरताच नाही, तर केसांपासून ते कपड्यांपर्यंत सगळ्या स्टाईलला ‘कोरियन टच’ मिळालाय. आता मुलींना आवडतो ‘लेस इज मोर’ वाला मेकअप, जिथे फोकस असतो फक्त हेल्दी आणि ग्लोइंग स्किनवर. कपडे स्टायलिश तर हवेच, पण त्यासोबत ‘कंफर्ट फर्स्ट’ हा नियम! आणि केसांचा लुक एकदम सॉफ्ट आणि नॅचरल, जणू वाऱ्याने अलगद विखुरलेले! हे सगळं मिळून तयार होतंय आजचं एकदम ‘इन’ असलेलं ‘फॅशन स्टेटमेंट’!
आश्चर्याची गोष्ट म्हणजे या ‘ब्युटी रिव्होल्यूशन’मध्ये फक्त मुलीच नाही, तर अनेक ‘हँडसम हंक्स’ सुद्धा सामील झाले आहेत! त्यांनाही आता ‘स्किन केअर’ची पॉवर कळली आहे आणि तेही आपल्या त्वचेची काळजी घेण्यात मागे नाहीत. इंस्टाग्राम रील्स, यूट्यूब व्लॉग्स आणि ब्युटी इन्फ्लुएन्सर्स तर या ‘के-ब्युटी किक’ला घराघरात पोहोचवत आहेत. ते नवनवीन प्रोडक्ट्स ट्राय करतात, त्याचे रिव्ह्यू देतात आणि आपल्या फॉलोअर्सना ‘ग्लोइंग’ राहण्यासाठी टिप्स देत राहतात!
म्हणायला गेलं तर, K-स्किन केअरचा हा ट्रेंड भारतात नुसता आला नाही, तर त्याने इथल्या ‘ब्युटी इंडस्ट्री’ला एकदम ‘झिंग’ आणली आहे! आजकाल हे फक्त एक फॅड नाही राहिलंय, तर अनेक तरुणांसाठी ही एक ‘लाईफस्टाईल अपग्रेड’ आहे – स्वतःच्या त्वचेला प्रेमळपणे ट्रीट करण्याची आणि ‘फिल्टरशिवाय’ सुंदर दिसण्याची एक सुपर कूल पद्धत! आणि यातच दडलंय ‘इंडिया’च्या नव्या ‘ग्लोइंग’ अवताराचं खरं ‘सिक्रेट’!
न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे