कदम वस्तीच्या सरपंचांनी प्रत्येक वार्ड मध्ये जाऊन केली पाहणी

कदमवाकवस्ती, दि. ४ जून २०२०: कदमवाकवस्ती येथे आज दि.०४ जून रोजी सकाळी प्रत्येक वार्ड मध्ये जाऊन नागरिकांच्या अडचणी व एक तारखेपासून सतत पाऊस पडत असल्यामुळे गोर-गरीब लोकांचे हाल होऊ नये म्हणून ही पाहणी केली . तसेच टोल नाका कवडीपाट येथे कचरा खत वाहतूक करणारी गाडी त्या ठिकाणी काम करत असताना पलटी झाली होती. सर्व कचरा रस्त्यावर पडून रोड जॅम झाला होता. त्या ठिकाणी ताबडतोब जाऊन जेसीबीच्या साह्याने व ग्रामपंचायत कदमवाक वस्तीच्या कचरा वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या साह्याने रस्त्यावरील कचरा उचलून सोलापूर हायवे मोकळा करण्यात आला. त्यानंतर आष्टापुरे मळा येथे लोकांच्या घरासमोरील ड्रेनेज लाईन अडकली असता ते पाणी शेतकऱ्यांच्या रानामध्ये जात होते. त्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला असणारा पाठ दुरुस्त करण्यासाठी जेसीपी बोलावून त्या ठिकाणी तातडीने काम करून घेतले.

पालखी स्थळ येथे केशरी कार्ड धारकांना रेशन वाटप सुरू आहे का नाही हे ते त्या ठिकाणी जाऊन रेशन दुकानदाराच्या समस्या जाणून घेतल्या व त्या नंतर संपूर्ण कदमवाक वस्ती गावांमध्ये काल झालेल्या वादळी वारा व पावसामुळे गावामधील घराचं किंवा पिकांचं काही नुकसान झालं का ? त्याची पाहणी केली.

इंडियन ऑइल कंपनी सी एस आर मार्फत कदमवाकवस्ती गावासाठी टोलनाका ते इंडियन ऑईल सोलापूर हायवेच्या मधोमध लाइट्सचे खांब व लाइट्स मिळण्यासाठी खूप मोलाची मदत केली आहे. असे न्यूज अनकट बोलताना गौरी चित्तरंजन गायकवाड यांनी सांगितले आहे. यावेळी चंद्रदीप काळभोर, भाजपा नेते चितरंजन गायकवाड, ग्रामसेवक प्रवीण देसाई, ग्रामपंचायत सदस्य व नागरिक यांनीही सहकार्य केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा