कदमवाकवस्ती :ग्रामपंचायत कदमवाकवस्ती येथे कोरोनो या विषाणुला आळा घालण्यासाठी तत्पर, कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या सरपंच गौरी गायकवाड यांनी गावात कोरोनो प्रतिबंध वैद्यकीय समिती स्थापन करून गावात घरो -घरी जाऊन वैद्यकीय तपासणीची उपायोजना सुरू केली आहे. संपूर्ण कदमवाकवस्ती गावात औषध फवारणी चालू आहे त्याचप्रमाणे जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा नागरिकांना भासू नये यासाठी उपाययोजना केल्या आहेत
किराणा दुकानदार यांना घरपोच सेवा देण्यास सुचविले त्याचप्रमाणे मेडिकल, दूध डेअरी, भाजीपाला विक्रेते यांच्यावर देखील नियंत्रण ठेवले व गावात प्रत्येक घरा मध्ये भाजी पाला घरपोच देण्यासाठी पण एक समिती नेमली आहे.नागरिकांची गर्दी होण्याला देखील आळा घातला, त्याचप्रमाणे गावांमध्ये दवंडी देऊन नागरिकांची जनजागृती केली.
सरपंचांच्या अध्यक्षतेखाली कोरोनो प्रतिबंध समिती स्थापन करून ग्रामपंचायत उपसरपंच/ सदस्य ,त्याच प्रमाणे ग्रामविकास अधिकारी, कर्मचारी तसेच चित्तरंजन गायकवाड यांचे या कामी खूप मोठे योगदान मिळालेआहे त्याचप्रमाणे गावचे सुपुत्र डॉ. रतन काळभोर हे या वैद्यकीय सेवेचे नियोजन पाहत आहेत यांनी गावात चोविस तास घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करून घेत आहेत वेळोवेळी लोणी काळभोर पोलीस प्रशासन यांची देखील याकामी खूप मदत मिळाली असल्याचे सरपंच गौरी गायकवाड यांनी सांगितले व नागरिकांनी सहकार्य करावे असे ही सरपंच यांनी सांगितले आहे.