ख्रिसमस सुरू व्हायला अवघे काही तास राहिले आहेत. जगभरात प्रभू येशूच्या जन्मदिनानित्ताने २५ डिसेंबरला ख्रिसमस सण साजरा केला जातो. ख्रिश्चन धर्मातील लोक येशूला देवांचा मूलगा मानतात. मात्र तुम्हाला माहिती आहे का? जगातील काही देशांमध्ये २५ डिसेंबर नाही तर दुसऱ्याच दिवशी ख्रिसमस साजरा केला जातो.
यामागचे कारण आहे पोप ग्रेगोरी आणि ज्युलियन कँलेंडरमधील फरक.
यामुळे अनेक देशांमध्ये २५ डिसेंबरच्या ऐवजी ७ जानेवारीला ख्रिसमस साजरा केला जातो. या दोन्ही कॅलेंडरमध्ये १७ दिवसांचा फरक आहे. त्यामुळे वेगवेगळे कॅलेंडरनुसार चालणारे लोक वेगवेगळ्या दिवशी ख्रिसमस साजरा करत आहे. पश्चिमेकडील देशांमध्ये ग्रेगोरियन कॅलेंडर फॉलो केले जाते.
तर रशिया, युक्रेन, इस्त्रायल, इजिप्त आणि बुल्गारिया इत्यादी देशांमध्ये ख्रिसमसचा सण जानेवारी महिन्यात साजरा केला जातो.
१५८२ ला पोप ग्रेगोरी यांनी ग्रेगोरियन कॅलेंडर बनवले. त्यानुसार २५ डिसेंबरला ख्रिसमस साजरा केला जातो. तर इतर देशात ज्युलियन कॅलेंडरनुसार ७ जानेवारीला ख्रिसमस असतो.
वेगवेगळ्या देशांमध्ये हा सण वेगळवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. अनेक ठिकाणी मिरवणूक काढून समुद्र, नदीपर्यंत जातात व बर्फात खड्डा करून ब्लेस द वॉटर नावाची प्रथा पुर्ण केली जाते. येथे इतरांप्रमाणे गिफ्ट देण्याला एवढे महत्त्व दिले जात नाही.