काजोलने दिल्या मुलीला २० व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, म्हणाली……

16

मुंबई,२० एप्रिल २०२३: बी-टाऊनमध्ये असे अनेक स्टार किड्स आहेत जे बहुतेकदा प्रत्येकाला त्यांच्या फॅशन निवडी हावभाव आणि लुक्सने प्रभावित करतात.अजय देवगण आणि काजोल त्यांच्या सुंदर मुलीचा न्यासाचा २० वा वाढदिवस साजरा करत आहे. काजोल आणि अजय देवगण यांनी न्यासाच्या २० व्या वाढदिवसाच्या गोड शुभेच्छा दिल्या आहेत.

https://www.instagram.com/p/CrPnwZhK-8F/?igshid=MjljNjAzYmU=

या विशेष दिवशी न्यासाची आई काजोल ही तिच्याबरोबरचा गोड फोटो शेअर करत लिहिते की, “ही आपण आणि आपली कहाणी आहे. तुझी विनोदबुद्धी, तुझे विचारकौशल्य आणि तुझे स्वच्छ मन हे असेच राहो! तुला माझ्याकडून खूप खूप प्रेम. अशीच हसत रहा आणि माझ्याबरोबर कायम राहा.” तर अजय देवगननेही ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा; बाबांचा अभिमान’ असे म्हणत पोस्ट शेअर केली आहे.

https://www.instagram.com/p/CrPoAxpoS8o/?igshid=MjljNjAzYmU=

न्यासाने तिचे शालेय शिक्षण सिंगापूरमध्ये केले आहे. ती अनेकदा इतर स्टार मुलांसोबत पार्टी करताना दिसते. ती इतर कलाकारांच्या मुलांप्रमाणे तिच्या जबरदस्त आणि बोल्ड लूकने अनेकदा चाहत्यांच्या मनावर कब्जा करते. काही दिवसांपूर्वी, अजय देवगणची मुलगी न्यासा आणि तिची मैत्रीण ओरी अवत्रामणी सुट्टीसाठी राजस्थानला गेले. सुट्टीतील काही मजेशीर क्षण तिने शेअर सुद्धा केले आहेत.

याशिवाय, न्यासा नुकतीच नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर (NMACC) च्या भव्य उद्घाटनात तिची आई काजोलसोबत फिरताना दिसली आणि देसी टच असलेल्या त्यांच्या चमकदार पोशाखांनी प्रसिद्धी मिळवली.दरम्यान, तिच्या वर्क फ्रंटबद्दल बोलताना, तीला ग्लॅम इंडस्ट्रीचा भाग बनण्याची काहीही इच्छा नाही असं तिचे पालक काजोल आणि अजय देवगन ने सांगितलं.

न्यूज अनकट प्रतिनिधी:- ऋतुजा पंढरपुरे