९ ऑगस्ट १९२५ ब्रिटिशांचा खजिना वाहून नेणाऱ्या रेल्वेवर लखनौजवळ काकोरी येथे क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद आणि त्यांच्या अन्य सहकाऱ्यांनी ब्रिटिश सरकारला दहशत बसावी ह्या हेतूने हल्ला केला.
भारतीयांचे विविध प्रकारे शोषण करणाऱ्या इंग्रजाना देशाबाहेर काढण्यासाठी विविध पातळीवर संघर्ष सुरू होता. इंग्रजाना देशाबाहेर घालवण्यासाठी चंद्रशेखर आजाद आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ९ ऑगस्ट १९२५ रोजी लखनौ जिल्ह्यातील काकोरी रेल्वे स्थानकावरून ‘ईट डाउन सहारनपूर-लखनौ पॅसेंजर ट्रेन’ साखळी ओढून थांबवली आणि अशफाक उल्ला खान यांच्या नेतृत्वाखाली, क्रांतिकारक पंडित राम प्रसाद बिस्मिल यांनी चंद्रशेखर आझाद आणि इतर सहा साथीदारांच्या मदतीने छापे टाकून सरकारी खजिना लुटला.
काकोरीमध्ये ट्रेन लुटल्या नंतर क्रांतिकारकांनी इंग्रजांची तिजोरीची पेटी २०० मिटर रेल्वे ट्रॅकपासून दूर नेऊन तोडली. तिजोरी तोडण्यात आलेल्या जागेला ‘ककराहा बाबा स्थळ’ म्हणून ओळखले जाते. भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात ही घटना ‘काकोरी कट’ म्हणून ओळखली जाते. काकोरी कटाची जबाबदारी २० क्रांतिकारकांनी स्विकारली होती. काकोरी कटाचे मुख्य सूत्रधार म्हणून चंद्रशेखर आझाद यांना ओळखले जाते.
या रेल्वे दरोड्यात चार जर्मन बनावटीच्या माऊसर पिस्तुलांचा वापर करण्यात आला होता. क्रांतिकारकांद्वारे चालवल्या जाणाऱ्या स्वातंत्र्य चळवळीला चालना देण्यासाठी निधीची तत्काळ व्यवस्था करण्याची गरज असताना शाहजहांपूर येथे झालेल्या बैठकीत इंग्रज सरकारचा खजिना लुटण्याची योजना राम प्रसाद बिस्मिल यांनी आखली होती. ९ ऑगस्ट १९२५ रोजी नंतर, ब्रिटिश सरकारने त्यांच्या पक्षाच्या हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनच्या एकूण ४० क्रांतिकारकांवर सशस्त्र युद्ध पुकारल्याबद्दल, सरकारी खजिना लुटल्याबद्दल आणि प्रवाशांची हत्या केल्याबद्दल खटला सुरू केला, ज्यामध्ये राजेंद्रनाथ लाहिरी, पंडित राम प्रसाद बिस्मिल, अशफाक उल्ला खान आणि ठाकूर रोशन सिंग यांना (फाशीची शिक्षा) दिली गेली. या प्रकरणात, इतर १६ क्रांतिकारकांना किमान ४ वर्षे ते कमाल काळ्या पाण्याची (आजीवन कारावास) शिक्षा झाली.
न्यूज अनकट प्रतिनिधी: किरण कानडे