पालघर, १७ जुलै २०२० : सध्या महाराष्ट्रात आत्महत्यांच्या अनेक घटना समोर येत आहेत त्यातच आता एक अनोखी घटना समोर अली आहे.पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील निंबापूर महालपाडा येथे राहणाऱ्या ३१ वर्षीय गंगाराम रमेश चौधरी या चित्रकला शिक्षकाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. विशेष म्हणजे गंगाराम रमेश चौधरी याने स्वतःच्या हातून काढलेल्या स्वतःच्या चित्रावर मृत्यूची तारीख लिहून त्या फोटोला हार घालून गळफास घेतला.
गंगाराम चौधरी हे चळणी येथील शाळेत विनाअनुदानित शाळेत चित्रकलेचे शिक्षक म्हणून कार्यरत होते.५ वर्ष वेतन मिळत नाही त्यात त्यांचे लग्न २०१६ साली झाले होते त्यांची बायको ही माहेरी निघून गेली होती. ह्या कारणाने अस्वस्थ होऊन त्यानीं आत्महत्या केल्याचे समजते.गंगाराम रमेश चौधरी पारंगत आणि वारली चित्रकार होते.गंगाराम रमेश चौधरीने ८ जून रोजी स्वतःचे चित्र काढले आणि त्यावर १५ जुलै २०२० अशी मृत्यू तारीख टाकली आणि फोटोला हार घातला व एक फोटो व्हॉट्सअॅपद्वारे आप्तेष्टाला पाठवला.
पावसामुळे शेताची कामे सुरु आहेत. काल त्याच्या घरातील सर्व लोक भात लावणीसाठी शेतात निघून गेली होती.त्याच दरम्यान घरात एकटाच असताना गंगाराम चौधरी यांनी गळफास घेऊन आत्महत्या करून आपले जीवन संपवले.
न्यूज अनकट प्रतिनिधी
, १७ जुलै २०२० : सध्या महाराष्ट्रात आत्महत्यांच्या अनेक घटना समोर येत आहेत त्यातच आता एक अनोखी घटना समोर अली आहे.पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील निंबापूर महालपाडा येथे राहणाऱ्या ३१ वर्षीय गंगाराम रमेश चौधरी या चित्रकला शिक्षकाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. विशेष म्हणजे गंगाराम रमेश चौधरी याने स्वतःच्या हातून काढलेल्या स्वतःच्या चित्रावर मृत्यूची तारीख लिहून त्या फोटोला हार घालून गळफास घेतला.