कलम ३७० रद्द केल्यापासून जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यांमध्ये २० ठार

दिल्ली: पाच ऑगस्ट रोजी सरकारने कलम ३७० आणि ३५ A रद्द केल्यानंतर कश्मीर मधील दहशतवादी कारवायांमध्ये आत्तापर्यंत तीन सुरक्षा कर्मचारी आणि सतरा नागरिक मृत्युमुखी पडले आहेत अशी माहिती संसदेत गृहमंत्रालयाने दिली.
या कालावधीत १२९ व्यक्ती जखमी झाल्याची माहिती संसदेत अब्दुल वहाब यांच्या प्रश्नाला लेखी उत्तर देताना गृह राज्यमंत्री जी किशन रेड्डी यांनी संसदेत दिली. जम्मू-काश्मीर सरकारच्या आव्हानाचा हवाला देत एमएचएने असेही म्हटले आहे की कायदा व सुव्यवस्थेच्या घटनांमध्ये ऑगस्टपासून पोलिस कारवाईत कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही.
जम्मू-काश्मीरमध्ये ऑगस्टपासून ५,१६१ लोकांना अटक करण्यात आली आहे. यापैकी फक्त ६०९ जण सध्या कोठडीत आहेत. अटक केलेल्या एकूण आरोपींपैकी किमान २८१ जण दगडफेक करणारे असल्याचे समजते.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा