कळाशी येथे रक्तदान शिबिर संपन्न

8

इंदापूर, दि. १९ जून २०२०: राज्यातील रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा असल्याने शुक्रवारी प्रविणभैय्या माने युवामंच व शिवशंभू चॅरिटेबलच्या ट्रस्टच्या माध्यमातून आयोजित रक्तदान शिबिर इंदापूर तालुक्यातील बोरी आणि कळाशीयेथे संपन्न झाले. पुणे जिल्हा परिषद सदस्य व माजी बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रविण माने यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

कळाशी येथे आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचे उदघाटन पुणे सहकार बोर्ड संचालक राजेंद्र गोलांडे यांच्या हस्ते पार पडले. या शिबिरात रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास २० लिटर पाण्याचे जार, सॅनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले. प्रविणभैय्या माने युवामंचच्या माध्यमातून जिल्हा परिषद सदस्य प्रविण माने यांच्या मित्र परिवाराने हा समाजसेवेचा वसा जपण्याचे कार्य करण्यात आले असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

कळाशी येथे संपन्न झालेल्या रक्तदान कार्यक्रमाप्रसंगी पुणे सहकार बोर्ड संचालक राजेंद्र गोलांडे, किरण देवकर, तुकाराम गोलांडे, शिवशंभु चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष भूषण सुर्वे, चंद्रकांत देवकर, मारुती भोई, दादा भालेकर, बाळू भोई, विनोद शिंदे, युवराज रेडके, अहमद शेख, हनुमंत बाबर, काकासाहेब चव्हाण, संतोष देवमाने, बाकेश शिंदे, उद्धव रेडके, अमरनाथ सूर्यवंशी, दयानंद गायकवाड, पोपट लोखंडे आणि कळाशी ग्रामस्थ व इतर सहकारी मान्यवरही उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे