कालिचरण महाराज छत्तीसगडमधून फरार! रायपूर पोलीस महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात घेणार शोध

रायपूर, 30 डिसेंबर 2021: रायपूर येथे झालेल्या धर्मसभेत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी कालीचरण महाराजांच्या अडचणीत वाढ होत आहे. रायपूर पोलिसांनी कालीचरणविरुद्ध गुन्हा दाखल करून शोध सुरू केला आहे.

गुन्हा दाखल झाल्यापासून कालीचरण महाराज रायपूरमधून फरार असल्याचे सांगण्यात येत आहे. कालीचरणच्या शोधात रायपूर पोलीस आता महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात रवाना झाले आहेत.

काय आहे प्रकरण

छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये झालेल्या धर्म संसदेत धर्मगुरू कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधींबद्दल अपशब्द बोलले होते. त्याचवेळी त्यांनी गांधीजींच्या हत्येबद्दल नथुराम गोडसेचे कौतुक केले.

कालीचरण म्हणाले होते, “राजकारणातून राष्ट्र काबीज करणे हे इस्लामचे ध्येय आहे. आमच्या डोळ्यांसमोर त्यांनी 1947 मध्ये कब्जा केला. त्यांनी यापूर्वी इराण, इराक आणि अफगाणिस्तानवर ताबा मिळवला होता. त्यांनी राजकारणाच्या माध्यमातून बांगलादेश ताब्यात घेतला होता. “आणि पाकिस्तानवर कब्जा केला… मोहनदास करमचंद गांधींना मारल्याबद्दल नथुराम गोडसेला सलाम.

रायपूरमध्ये गुन्हा दाखल

कलम 505(2) आणि कलम 294 अन्वये कालीचरण महाराजांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रायपूरचे माजी महापौर आणि विद्यमान अध्यक्ष प्रमोद दुबे यांनी संत कालीचरण यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. त्याचवेळी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी महात्मा गांधींवर टीका करताना भडकाऊ भाषण करणाऱ्या कालीचरण महाराजांना अटक करून कायदेशीर कारवाई केली जाईल, असे सांगितले होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा