गोल पोस्ट महाराष्ट्र काळ्या बाहुलीला फोटो लावून झाडाला ठोकला बाहुली

काळ्या बाहुलीला फोटो लावून झाडाला ठोकला बाहुली

लोणावळा : लोणावळा येथील तुंग गावातील इसार शाळेजवळ असलेल्या एका झाडावर मावळ तालुक्यातील नऊ प्रतिष्ठित व्यक्तींच्या फोटोवर जादूटोणा भानामती केल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे.
जादूटोणा करण्यात आलेल्या व्यक्तीमध्ये जमिनीची खरेदी विक्री करणाऱ्या प्रसिद्ध उद्योगपती तसेच तालुक्‍यातील प्रगतशील शेतकऱ्यांचा समावेश आहे.

घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण मावळ तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. अशोकाच्या एका झाडाला ९ जणांचे फोटो खिळ्याने ठोकून त्यावर लिंबु, काळ्या बाहुल्या,बिबा, टाचण्या लावून भानामतीसारखा अघोरी प्रकार केल्याची घटनासमोर आली आहे.

लोणावळा ग्रामीण पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत झाडाला लावलेल्या सर्व प्रतिष्ठित व्यक्तींच्या फोटोवरील लिंबू, टाचण्या, बाहुल्या काढून टाकल्या आहेत.

या घटनेसंदर्भात लोणावळा ग्रामीण पोलिसांना संबंधित व्यक्तींनी तक्रारी अर्ज दिला असून असं कृत्य करणाऱ्या संबंधितांवर जादूटोणा कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी करण्यात आलेली आहे.

निर्जनस्थळी घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेमागचा सूत्रधार कोण आहे, हे शोधण्याचे आव्हान लोणावळा ग्रामीण पोलिसांसमोर आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version