कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येत कल्याण डोंबिवलीचा दुसरा क्रमांक

कल्याण, दि. २१ जुलै २०२०: मुंबई पाठोपाठ आता कल्याण-डोंबिवलीने कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येत आपला नंबर लावला आहे. मुंबई महानगर क्षेत्रामध्ये केडीएमसीने दुसरा क्रमांक लावला आहे. मागील काही दिवसांपासून केडीएमसीत दररोज ३०० ते ६०० कोरोना बाधित आढळून येत आहेत. शहरातील एकूण रुग्णांचा आकडा १७ हजारांच्या पुढे गेला आहे. त्यामुळे येथे कडक लॉकडाउन पाळला जातोय. एवढ्यावरच कल्याण-डोंबिवली थांबली नाही तर येथे धारावी पॅटर्न राबवला जात आहे. गेल्या महिन्याभरात ३ वेळा लॉकडाउन वाढवण्यात आला आहे.

मुंबई महानगर क्षेत्रामध्ये नऊ महापालिका येतात. त्यामध्ये मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, मिरा-भाईंदर, वसई-विरार आणि पनवेल महापलिकांचा समावेश आहे. मात्र यात मुंबई प्रथम तर केडीएमसी दुसऱ्या क्रंमाकावर आहे. केडीएमसीत आतापर्यंत १७ हजार ६४० करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ९ हजार ३०७ रुग्ण हे २ ते १९ जुलै या कालावधीत आढळून आले आहेत.

ठाणे महापालिका क्षेत्रात आतापर्यंत १६ हजार ८९४ इतके रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे ठाण्यापेक्षा कल्याण-डोंबिवली रुग्णसंख्येत पुढे आहे. वाढत्या रुग्णसंख्येचा आकडा कमी करायचा असेल तर कडक उपाययोजना करणे केडीएमसीला गरजेच आहे.

न्यूज अनकट प्रतिनीधी: राजश्री वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा